हा स्मॉलकॅप शेअर १० तुकड्यांमध्ये विभागणार, Stcok Split ला गुंतवणूकदारांची नापसंती, शेअर्सला दोन दिवस लोअर सर्किट
ET Marathi April 25, 2025 03:45 PM
मुंबई : कापड क्षेत्रातील कंपनी पदम कॉटन यार्न्सने आपल्या शेअर्सचे विभाजन म्हणजेच स्टाॅक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी एका शेअरचे १० शेअर्समध्ये विभाजन करणार आहे. मात्र गुंतवणूकदारांना कंपनीचा हा निर्णय आवडला नसल्याचे दिसूुन येते. स्टाॅक स्प्लिटच्या घोषणेनंतर गेल्या २ दिवसांपासून कंपनीच्या शेअर्सला लोअर सर्किट लागत आहेत. गुरुवार २४ एप्रिल रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर ५ टक्क्यांनी घसरून ६९.२० रुपयांवर बंद झाले. याआधी बुधवार, २३ एप्रिल रोजी शेअर्स लोअर सर्किट लागून २.८४ रुपयांवर आला होता.पद्मा कॉटन यार्नने बुधवार २३ एप्रिल रोजी शेअर बाजाराला माहिती दिली की, संचालक मंडळाने २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत स्टॉक स्प्लिटच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. हे स्टॉक स्प्लिट १:१० च्या प्रमाणात केले जाईल. याचा अर्थ असा की १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या कंपनीच्या प्रत्येक शेअरची विभागणी १ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १० शेअर्समध्ये केली जाईल.कंपनीने म्हटले आहे की आता ते या स्टॉक स्प्लिट निर्णयावर शेअरहोल्डर्सची मान्यता घेईल आणि त्यानंतर स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर करेल. स्टॉक स्प्लिटमध्ये कंपनी तिचे शेअर्स लहान भागांमध्ये विभागते. यामुळे शेअरची किंमत कमी होते आणि ते अधिक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध होते. यामुळे शेअर्समधील तरलता वाढते.पदम कॉटन यार्नचा शेअर गुरुवारी ५ टक्क्यांनी घसरून ६९.२० रुपयांवर बंद झाला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२७.५६ रुपये आहे. शेअर्स सध्या त्या पातळीपेक्षा ४५ टक्क्यांनी खाली व्यवहार करत आहे. मात्र, ५२ आठवड्यांच्या नीचांकी ९.६१ रुपयांकडे पाहिले तर, या पातळीपासून शेअरमध्ये सुमारे ५५० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप ८९.३४ कोटी रुपये आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.