युद्धाच्या सावटाने शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला, डिफेन्स सेक्टरला फटका
Marathi April 25, 2025 04:39 PM

आज शेअर बाजार: देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 28 निष्पाप भारतीय पर्यटकांना जीव गमवावा लागलाय. या घटनेने देशभरात संतापची लाट  उसळली असताना या प्रकारणी केंद्र सरकारने गंभीर पावले उचलत पाकिस्तानची (Pakistan  Stock Exchange) चहुबाजूंनी कोंडी करायला सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तानविरोधात दिलेल्या जोरदार राजनैतिक प्रत्युत्तरामुळे  शेअर बाजारात (Stock Exchange)  मोठी खळबळ उडाल्याचे चित्र आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा थेट परिणाम आता दोन्ही देशांच्या शेअर बाजारांवर दिसून येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडल्याने सध्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच आज (शुक्रवारी)सेन्सेक्स 1 हजार अंकांनी गडगडला आहे. तर निफ्टी देखील 341 अंकांनी खाली आला आहे.

दोन देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजार गडगडला

भारत-पाकिस्तानमधील भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजार गडगडला असल्याचे चित्र आहे. संथगतीच्या सुरुवातीनंतर बाजारात पडझड होण्यास सुरुवात झालीय. तर या पडझडीचा थेट फटका संरक्षण क्षेत्रातील समभागांना होणार असल्याचे बोलले जात आहे. सकाळी 9.20 मिनिटला  बाजार उघडताच, सेन्सेक्स 28.72 अंकांनी किंवा 0.04 टक्क्यांनी वाढून 79, 830.15 च्या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 99.80 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी वाढीसह 24. 346.50 च्या पातळीवर पोहोचला. पण सुरुवातीच्या हिरव्यागार वातावरणानंतर शेअर बाजारात घसरण दिसून आली. यानंतर, सकाळी 10 वाजता, सेन्सेक्स 881.49 अंकांनी घसरून 78,919.94 च्या पातळीवर पोहोचला आणि त्यानंतर आता तो एक हजार अंकांनी घसरला आहे. दुसरीकडे, निफ्टी 285.05 अंकांनी घसरून 23,961.65 वर पोहोचला आणि आता तो 23000 च्या पातळीवर पोहोचला आहे.

भारत-पाकिस्तान तणावाचा बाजारावर परिणाम

सेन्सेक्स सुमारे 800 अंकांनी घसरला आहे, तर निफ्टी 2400 च्या खाली आहे. एका दिवसापूर्वी, भारतीय शेअर बाजारात सलग सात दिवसांच्या वाढीनंतर घसरण दिसून आली. सेन्सेक्स 315.06 अंकांनी किंवा 0.39 टक्क्यांनी घसरून 79,801.43 वर बंद झाला, तर निफ्टी 5082.50 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी घसरून 24,246.70 वर बंद झाला. भारताच्या या कारवाईनंतर, पाकिस्तानने नवी दिल्लीसोबतच्या सर्व व्यापारी क्रियाकलापांवर ब्रेक लगावला आहे. याशिवाय, सिंधू पाणी कराराचे उल्लंघन करून पाण्याचा प्रवाह रोखण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचा गुन्हा मानला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने इस्लामाबादविरुद्ध केलेल्या राजनैतिक कारवाईनंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.

पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला

दुसरीकडे, जर आपण पाकिस्तानच्या शेअर बाजाराकडे बघितले तर, पहलगाम घटनेवर भारत सरकारने केलेल्या कारवाईनंतर गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानच्या शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. गुरुवारी कराची स्टॉक इंडेक्समध्ये जवळपास 2000 अंकांची घसरण दिसून आली.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.