सतत भूकंपाबाबत भाकीत करणं म्यानमारमध्ये एका व्यक्तीच्या चांगलंच अंगलट आलं आहे. स्वत:ला ज्योतिषी म्हणून घेणार्या या व्यक्तीला म्यानमार पोलिसांनी अटक केलं आहे. तसेच त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे. जॉन मो द असं या व्यक्तीचं नाव आहे. जॉन मो द हा मॅनमारमध्ये प्रसिद्ध ज्योतिषी म्हणून ओळखला जातो. मात्र आता या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, जॉनवर केलेल्या कारवाईची सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे.
इलेव्हन म्यानमार मीडियानं दिलेल्या माहितीनुसार जॉन मो द हा दररोज भूकंपासंदर्भात भविष्यवाणी करत होता, तो आपल्या भविष्यवाणीचे व्हिडीओ बनवून टिकटॉकवर देखील अपलोड करत होता.चीनी कंपनी असलेल्या टिकटॉकवर त्याचे तब्बल तीन लाख फॉलोअर्स आहेत. त्याचे हे व्हिडीओ मॅनमारमध्ये खूप प्रसिद्ध होते. लोकांचा त्याच्या भविष्यवाणीवर खूप विश्वास आहे.
दरम्यान हा बाबा दररोज भूकंपासंदर्भात भाकीत करायचा आज भूकंप येणार आहे, लोकांनी मोठ्या इमारतीमध्ये जाऊ नये, असं सांगायचा. लोकांना त्याच्यावर विश्वास असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हायचं, त्यामुळे लोक कामाला जाणं टाळायचे. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण व्हायचं, मात्र त्याचं भाकीत खोट ठरायचं. बाबाच्या या व्हिडीओची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे, त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही या बाबाला अटक केलं आहे, लोकांना भीती दाखवने आणि अफवा पसरवणे या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.न्यायालनानं त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, आपण व्ह्यूज मिळवण्यासाठी हे करायचो अशी कबुली या बाबानं दिली आहे.
दरम्यान सध्या या बाबाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे, हा बाबा म्यानमारमध्ये खूपच प्रसिद्ध आहे, लोकांचा त्याच्यावर विश्वास असल्यामुळे त्याने बनवलेल्या व्हिडीओमुळे देशात खळबळ उडाली होती. तो वारंवार भूकंपाबद्दल भाकीत करत होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.