नाटककार शशिकांत मोरे यांचे निधन
esakal April 26, 2025 12:45 AM

नाटककार शशिकांत मोरे यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : नाटककार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मोरे (वय ७२) यांचे नुकतेच अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, भाऊ डॉ. सुरेंद्र मोरे, बहीण ॲड. दीपाली शिर्के, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे. ‘आव्हान’ संघटना व पाक्षिक ‘मापदंड’च्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक समस्यांना वाचा फोडून अन्यायग्रस्तांना, पीडितांना न्याय मिळवून दिला. ‘नागीण’ या व्यावसायिक नाटकाचे त्यांनी लेखन केले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.