Goa News: पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह गोव्याचे उपसभापती व्हॅटिकन सिटीला रवाना; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी
dainikgomantak April 26, 2025 12:45 AM
पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह गोव्याचे उपसभापती व्हॅटिकन सिटीला रवाना

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, संसदीय कामकाम मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोव्याचे उपसभापती जोशुआ डिसोझा व्हॅटिकन सिटीला रवाना झाले.

अमोल काणेकर यांची केपे नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने निवडून आलेले अमोल काणेकर यांची केपे नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी अध्यक्षा दीपाली नाईक, दक्षिण गोवा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, नगरसेवक दयेश नाईक, सुचिता शिरवाईकर, चेतन हळदणकर, गणपत मोडक आणि प्रसाद फल देसाई यांच्या उपस्थितीत कणेकर यांचे अभिनंदन केले.

राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

गोव्यात दोन दिवस (२५, २६ एप्रिल) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या वेधशाळेने याबाबत यलो अलर्ट जारी केला आहे.

साखळी बाजारात चोरी, एक लाखांची रोखड लंपास

साखळी बाजारातील एका कॉस्मेटिक दुकानामागील घराचे दार फोडून आतील एक लाख रोख चोरट्यांनी केली लंपास. पोलीस घटनास्थळी दाखल.

मराठी-कोंकणी वाद! घटनेत व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, मी चुकीचे बोललेलो नाही

'ज्यांना मराठी पाहिजे त्यांनी महाराष्ट्रात जावे' ह्या फेसबुक पोस्टवर म्हार्दोळ पोलिस स्थानकात डॉ.मधू घोडकिरेकरांच्या तक्रारीवर कोंकणी लेखक प्रकाश नाईक ह्यांच्या विरोधात म्हार्दोळ पोलिस स्थानकात गुन्हा नोंद.मी काहीही चुकीचे बोललेलो नाही.कोंकणी गोव्याची राज्यभाषा. मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा.लेखक प्रकाश नाईकांचा पुनरोच्चार.

आपत्ती आलीच तर... डिचोलीत 'मॉक ड्रिल' यशस्वी..!

आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेतर्फे डिचोलीतील बागवाडा आणि साळ येथे 'मॉक ड्रिल'. पुराच्या आपत्तीवेळी बुडणाऱ्यांची सुटका करण्यासाठी प्रात्यक्षीकाद्वारे मदतकार्या संबंधी मार्गदर्शन.

दूधसागर नदीवर ताकार- दावकोण येथील ३२ वर्षीय तरुण बुडाला

ताकार- दावकोण येथ दूधसागर नदीवर आंघोळीसाठी गेलेला अनिल बाळेगाळ (३२, वास्को) युवक बेपत्ता होता त्याचा मृतदेह शुक्रवारी (२५ एप्रिल) सकाळी कुडचडे अग्नीशामक दलच्या जवांनानी पाण्यातुन बाहेर काढला. कुळे पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरिक्षक विभावरी गांवकर यांनी पंचनामा करुन मृतदेह मडगाव येथे शवचिकित्सा करण्यासाठी पाठविला.

Abduction Case: अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न, काणका स्थानिकांनी उधळला कट

काणका येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न स्थानिकांनी उधळून लावला. मुलगी मोठ्याने रडायला लागल्यानंतर स्थानिक गोळा झाले आणि अपहरण करण्यासाठी आलेले संशयित घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.