महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.
Nashik Update : नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत 50 लाख अर्ज वेळेत निकाली; आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची माहिती‘आपली सेवा- आमचे कर्तव्य’ असे सांगणाऱ्या लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस सोमवार 28 एप्रिलला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कायद्यांतर्गत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत विविध लोकसेवांसाठी एकूण 55 लाख 48 हजार 485 अर्ज प्राप्त झाले. 51 लाख 37 हजार 474 अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिली आहे.
Ahilyanagar Update : अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदीाच आदेश जारीअहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये 9 मे रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी केला आहे.
Amc Corporation : अहिल्यानगर महापालिकेची क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून कामकाजाची पाहणीराज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री 100 दिवस उपक्रमा’त अहिल्यानगर महापालिका प्रभावी अंमलबजावणी करत असल्याची नोंद क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (QCI) शिष्टमंडळाने घेतली. नगरविकास विभागाच्या पहिल्या फेरीच्या मूल्यांकनात राज्यातील एकूण 29 महापालिकांपैकी केवळ ६ महापालिका शॉर्टलिस्ट करण्यात आल्या असून, त्यामध्ये अहिल्यानगरचा समावेश करण्यात आला आहे. या ६ महानगरपालिकांमध्ये पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उल्हासनगर आणि अहिल्यानगर यांचा समावेश आहे.
Suhas Babar And Rohit Patil : पाटील-बाबरांची राजकीय जुगलबंदी; 'पाच वर्षांनंतरची फायनल जिंकण्याची तयारी'सांगलीच्या खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर आणि तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यां दोन तरुण आमदारांमध्ये एकाच व्यासपीठावर राजकीय जुगलबंदी रंगली. आमदार बाबर यांनी "व्हेरी गुड मॅन, बट इन बॅड कंपनी", या टोल्याला आमदार पाटील यांनी, सध्याची परिस्थिती काही जरी असली, तरी पाच वर्षांनंतर फायनल आम्हीच मारणार, असं जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Devendra Fadnavis : शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड, आठ वाहनतळ उभारण्यास मान्यताआगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड, आठ वाहनतळ उभारण्यास आणि विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
Jaykumar Gore : युद्ध झालं तर जगाच्या नकाशावर पाकिस्तान दिसणार नाही : जयकुमार गोरेयुद्ध झालं तर जगाच्या नकाशावर पाकिस्तान दिसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. पण, युद्ध करणं न करणं हा स्ट्रॅटेजीचा भाग असतो, असे विधान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
Eknath Shinde : आदिल शाह यांच्या कुटुंबीयांस एकनाथ शिंदे घर बांधून देणारजम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांना वाचविणाऱ्या आदिल शाह यांची अतिरेक्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्या शाह यांच्या कुटुंबीयांस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची रोख रक्कम आणि घर बांधून देण्याची घोषणा केली आहे.
Chandrashekhar Bawankule : केंद्रात मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजी हे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकतंदेवेंद्र फडणवीस हे 2034 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहतील, असे विधान राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्र विकसित करायचा आहे. केंद्रात मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजी हे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकतं, असेही त्यांनी म्हटले.
मला सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय आहे. मी पहाटे चारपासून कामाला सुरुवात करतो. रात्री अकरापर्यंत मी काम करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री अकरापासून मध्यरात्री दोनपर्यंत काम करत असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री दोनपासून चारपर्यंत काम करत असतात, त्यामुळे आमचे महायुतीचे सरकार २४ तास काम करते, असा अजब दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
Devendra Fadnavis News : पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावापहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांचे मॉनिटरिंग सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पाकिस्तानी नागरिकांनी तातडीने देश सोडावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Rahul Gandhi News : राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखलकाँग्रेस नेते राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींना ते भेटून त्यांची विचारपूस करणार आहेत. गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही पहलगाममध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
Sharad Pawar NCP News : प्रवक्त्यांचे पॅनेल बरखास्तराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांचे पॅनेल बरखास्त केले आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. मागील काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Maha Yuti Govt : महायुतीमधील कॅबिनेट खात्यांच्या कामांचे ऑडिटमहायुतीमधील कॅबिनेट खात्यांच्या कामांचे ऑडिट करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीया या कंपनीकडून प्रत्येक विभागाचं लेखापरीक्षण अर्थात ऑडिट करण्यात आले आहे. या ऑडिटनंतर एकूण 60 विभागांपैकी सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या आठ विभागांची निवड करण्यात आली आहे. आता या आठ विभागांमधून पहिले तीन विभाग निवडले जाणार आहेत. येत्या आठवडाभरात महायुती सरकारमधील सर्वात चांगली कामगिरी करणारे तीन विभाग कोणते असतील, याचा निकाल जाहीर केला जाईल.
Guru Chichkar : बिल्डर गुरु चिचकर यांनी डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलंनवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकर यांचे वडील गुरु चिचकर यांनी आज आपल्या राहत्या घरी जीवन संपविल्याची घटना घडली. गुरु चिचकार यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी गुरु चिचकर यांनी एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. जी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे.
Maha Yuti Govt. : महायुती सरकारचे काम चालते तीन शिप्टमध्येपुणे येथे एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे सरकार 24 तास जनतेच्या सेवेत असते असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिनचर्या सांगितली. ते म्हणाले. मी पहाटे 4 वाजता उठतो. फिरतो, व्यायाम करतो. पहाटे ४ वाजता उठून कामाला सुरुवात करतो. यानतंर 10 ते 11 पर्यंत काम करतो. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 11 ते 2 काम करतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 2 ते 4 या वेळेत काम करतात. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर आहे असे अजित पवार म्हणाले.
कुणाल कामराला अटक करू नका - कोर्टकुणाल कामरा याच्या विरोधात दाखल झालेल्या एफआरआयमध्ये अटक करू नका, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे कुमाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भारताची ताकद दाखवून द्या - मोहन भागवतपहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताची ताकद दाखवून द्या. हिंदू कधीही कोणाला धर्म विचारून मारणार नाही. मात्र. त्या लोकांनी ते केले आहे. फक्त ताकद असून उपयोग असून उपयोग नाही ती दाखवलीही पाहिजे.
Pahalgam Terror Attack : दोन दहशतवाद्यांची घरं भारतीय सुरक्षा दलाने उद्ध्वस्त केलीजम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याशी संबंधित असलेले दोन स्थानिक दहशतवादी आदिल थोकर आणि आसिफ शेख यांची घर भारतीय सुरक्षा दलाने गुरुवारी रात्री उद्ध्वस्त केली आहेत.
Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; 2 पोलिस जखमीपहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शोध मोहीम राबवली आहे. याचवेळी आज बांदीपोरा येथे पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला आहे, तर दोन पोलिसांना गोळी लागल्याची माहिती आहे.
Nashik News : नाशिकमधील 6 पाकिस्तानी महिलांना देश सोडवा लागणारपहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडून जाण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. तर नाशिक पोलिसांना याबाबतचा फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यलयाकडून अद्याप कोणतेही लेखी आदेश नाही. मात्र, तसा आदेश येताच सरकारच्याआदेशानुसार पोलिस कारवाई करतील. त्यामुळे नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 6 पाकिस्तानी महिलांना देश सोडवा लागणार आहे.
Simla Agreement : पाकिस्तानकडून सिमला करार स्थगितपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत सिंधू पाणी करार रद्द केला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानने देखील सिमला करार स्थगित केला आहे.
Rahul Gandhi visit Kashmir : राहुल गांधी आज काश्मीर दौऱ्यावरपहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज काश्मीरला जाणार आहेत. ते जीएमसी अनंतबाग येथे जखमींना भेटणार आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी काश्मीरला जात असल्याने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.