Local Mega Block: रविवारी मुंबई रेल्वेवर मार्गावर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
esakal April 26, 2025 08:45 AM

मुंबई: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. २७) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार- ठाणेदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रेच्या अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे : विद्याविहार-ठाणे पाचवी-सहावी मार्गिका

कधी : सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉकदरम्यान ठाणे येथून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. एलटीटीकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. डाऊन मार्गाने जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील आणि पाचव्या मार्गावर ठाणे येथे वळवण्यात येणार आहेत. पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन, सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना विलंब होणार आहे.

हार्बर रेल्वे :

कुठे : सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

कधी : ११.१० ते ४.४० वाजेपर्यंत

परिणाम : कालावधीत सीएसएमटी/वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.