Latest Marathi News Updates : आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आझादपूरमध्ये पुकारण्यात आला बंद
esakal April 26, 2025 03:45 PM
Sanjay Sawkare : वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारेंना 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांचे काळे झेंडे

हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शक्तिपीठ रद्द व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांना हातकणंगलेजवळ काळे झेंडे दाखविण्यात आले. कोल्हापूरहून जयसिंगपूर येथे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानी जात असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने त्यांना काळे झेंडे दाखविले. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर जयसिंगपूर व हातकणंगले पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

Mahabaleshwar Tourism Festival : महाबळेश्वरला शुक्रवारपासून वाहतुकीत बदल

सातारा/भिलार : महाबळेश्वर येथे जिल्हा प्रशासन व पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दोन ते चार मे दरम्यान ‘पर्यटन महोत्सव - २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासनाने या कालावधीत महाबळेश्वरला जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे.

Azadpur Bandh : आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आझादपूरमध्ये पुकारण्यात आला बंद

आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आझादपूरमध्ये शनिवारी बंद पुकारण्यात आला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. बाजारपेठा बंद असल्या तरी शहरातील परिवहन व्यवस्था मात्र सुरळीतपणे सुरू होती.

Delhi News : दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद, लाल किल्ल्यासमोर 'पाकिस्तान मुर्दाबाद'ची घोषणाबाजी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. महानगरातील नऊशे पेक्षा जास्त बाजारपेठा व्यापाऱ्यांनी  बंद ठेवल्या होत्या. व्यापारी तसेच नागरिकांनी लाल किल्ल्यासमोर जमत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ची घोषणाबाजी केली. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भाजपचे खासदार प्रवीण खंडेलवाल हे यावेळी उपस्थित होते.

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त, दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची शोध मोहीम

Latest Marathi Live Updates 26 April 2025 : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर आणि ‘लष्करै तैयबा’चे दहशतवादी आदिल हुसैन ठोकेर आणि आसिफ शेख यांची घरे सुरक्षा दलांनी नष्ट केली. तसेच दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्राईल, अर्जेंटिना, इजिप्त आणि नेपाळच्या राजदूतांनी तसेच अनेक देशांच्या मुत्सद्यांनी परराष्ट्रमंत्री ए. जयशंकर यांची भेट घेऊन भारताला पाठिंबा दर्शविला. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. महानगरातील नऊशे पेक्षा जास्त बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या होत्या. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.