Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानप्रती संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे या घटनेचा बदला घेताल जाईल, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या प्रतिक्रिया विदेशातही उमटत आहेत. लंडन येथे पाकिस्तानी उच्चायोगापुढे मूळच्या भारतीय नागरिकांनी शांतीपूर्ण आंदोलन केले. मात्र याच आंदोलनादरम्यान, एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने केलेल्या कृतीचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. भारतात तर या अधिकाऱ्याचा व्हिडीओ पाहून संताप व्यक्तक केला जात आहे.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ लंडन येथील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर शुक्रवारी (25 एप्रिल) मूळच्या भारतीय नागरिकांनी शांतीपर्ण आंदोलन केले. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. लोकांनी या आंदोलनादरम्यान हिंसेला विरोध करणारे, पाकिस्तानचा निषेध करणारे पोस्टर्स दाखवण्यात आले. मात्र याच आंदोलनादरम्यान, पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याने आंदोलनकर्त्यांची तसेच भारताची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. भारतीय वायुसेनेचे पायलट अभिनंदन वर्धमान यांचे एक पोस्टर दाखवून या अधिकाऱ्याने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तालयात एक पाकिस्तानी अधिकारी दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून जगभरात पाकिस्तानवर टीका केली जात आहे. पाकिस्तानच्या सैन्यातील अधिकाऱ्यांना तसेच राजनयिक अधिकाऱ्यांमध्ये शिष्टाचाराचा अभाव आहे. एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या अधिकाऱ्याकडून शिष्टाचाराची अपेक्षा केली जाते. पण पण राजनयिक अधिकारी तसेच सैन्य अधिकारी हे अशिक्षित दिसत आहेत, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहे. व्हिडीओत दिसणारा हा पाकिस्तानी अधिकाऱ्याचे नाव तैमूर राहत असे असल्याचे म्हटले जात आहे.
लंडनमधील पाकिस्तानी उच्चायुक्तालयापुढे भारतीय नागरिक आंदोलन करत असताना पाकिस्तानी अधिकाऱ्याने भारताचे पायलट अभिनंदन वर्धमान यांचे पोस्टर समोर केले. सोबतच हात गळ्याकडे नेऊन आम्ही तुमचा गळा चिरू, असे सूचवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या याच कृतीचा सगळीकडे निषेध केला जात आहे. दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर जे धमकी देण्याचे काम करत होते, त्यांची ओळख पटवून इंग्लंडकडे त्याचा जाब विचारला जाईल, असे सांगितले.