IPL 2025 PBKS vs KKR Live Streaming : पंजाब विरुद्ध कोलकाता दुसऱ्यांदा आमनेसामने, अजिंक्यसेना गेल्या पराभवाची परतफेड करणार?
GH News April 26, 2025 07:10 PM

आयपीएल 2025 मधील निम्मे सामने यशस्वीपणे खेळवण्यात आले आहेत. सध्या रिवेंज विकचा थरार सुरु आहे. या रिवेंज वीकमध्ये आज 26 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ल आमनेसामने आहेत. दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघ 15 एप्रिलला आमनेसामने होते. तेव्हा पंजाबने घरच्या मैदानात कोलकातावर विजय मिळवला होता. त्यामुळे आता कोलकाताकडे आपल्या होम ग्राउंडमध्ये पराभवाची परतफेड करण्यासह विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे.

मुंबईकर खेळाडू आमनेसामने

या सामन्यानिमितातने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळणारे अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर आमनेसामने असणार आहेत. श्रेयसकडे पंजाबचं तर अजिंक्यकडे केकेआरच्या कर्णधारपदाची धुरा आहे. पंजाबने 15 एप्रिलला केकेआरविरुद्ध 111 धावांचा यशस्वी बचाव केला होता. पंजाबच्या गोलंदाजांनी 112 धावांचा पाठलाग करणाऱ्या केकेआरला 15.1 ओव्हरमध्ये 95 धावांवर गुंडाळलं होतं. त्यामुळे आता केकेआरची पंजाबविरुद्ध रणनिती कशी असणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

केकेआर विरुद्ध पंजाब सामना केव्हा?

केकेआर विरुद्ध पंजाब सामना शनिवारी 26 एप्रलिला आयोजित करण्यात आला आहे.

केकेआर विरुद्ध पंजाब सामना कुठे?

केकेआर विरुद्ध पंजाब सामना ईडन गार्डन्स, कोलकाता येथे होणार आहे.

केकेआर विरुद्ध पंजाब सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

केकेआर विरुद्ध पंजाब सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

केकेआर विरुद्ध पंजाब सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

केकेआर विरुद्ध पंजाब सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

केकेआर विरुद्ध पंजाब लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहता येईल?

केकेआर विरुद्ध पंजाब लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

दोन्ही संघांची स्थिती

कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांचा हा या मोसमातील प्रत्येकी नववा सामना आहे. मात्र केकेआरच्या तुलनेत पंजाब चांगल्या स्थितीत आहे. पंजाबने 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर केकेआरला फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये 10 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर केकेआर 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. केकेआरसाठी प्लेऑफच्या हिशोबाने पुढील प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे केकेआर आव्हानात्मक स्थितीत कशी कामगिरी करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.