Royal Enfield 350 शेजाऱ्यांनाही आवडली, शेवटी कंपनीला लॉन्च करावी लागली
GH News April 26, 2025 07:10 PM

रॉयल एन्फिल्ड कुणाला नाही आवडत, ही अगदी सर्वांना आवडणारी बाईक आहे, तुम्ही तरुण मंडळींना विचारलं की कोणती बाईक घ्यायची, तर लगेच उत्तर रॉयल एन्फिल्ड हेच येईल. या गाडीचा लूकच इतका खास आहे की भल्याभल्यांना या बाईकची भूरळ पडते. अहो ही बाईक आता आपल्या शेजाऱ्यांनाही आवडली आहे. या बाईकची मागणी इतकी वाढली की कंपनीला या देशात रॉयल एन्फिल्ड 350 ही लॉन्च करावी लागली. आता हा देश नेमका कोणता आहे, याविषयी पुढे जाणून घेऊया…

भारतात सर्वाधिक विकली जाणारी रॉयल एन्फिल्डची क्लासिक 350 ही बाईक नेपाळमध्येही विकली जाणार आहे. नुकतीच कंपनीने नेपाळमध्ये ही बाईक लाँच केली आहे. कंपनी ही बाईक सीकेडी मार्गाने नेपाळला पाठवणार आहे, म्हणजेच ती नेपाळमध्ये असेंबल केली जाईल. दमदार डिझाइन आणि परफॉर्मन्ससाठी ही बाईक जगभरात प्रसिद्ध आहे. ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी रॉयल एन्फिल्ड बाईक आहे.

नेपाळमध्ये ही बाईक 5 वेगवेगळ्या व्हेरियंट आणि 7 कलर ऑप्शनमध्ये विकली जाणार आहे. यात हेरिटेज, प्रीमियम, सिग्नल्स, क्लासिक डार्क आणि क्रोमचे पर्याय असतील. विशेष म्हणजे नेपाळमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत 5,55,000 नेपाळी रुपयांपासून 5,79,900 नेपाळी रुपयांपर्यंत असेल.

रॉयल एन्फिल्डने स्थानिक कंपनीशी हातमिळवणी केली

नेपाळमधील ‘फुलली नॉक डाऊन’ ( सीकेडी ) असेंब्ली प्लांट हा रॉयल एन्फिल्डचा भारताबाहेरील पाचवा असेंब्ली प्लांट आहे. सार्क क्षेत्रातील उत्पादकांच्या संभाव्यतेला लक्षणीय चालना देण्याच्या उद्देशाने मोटारसायकल निर्मात्याने नेपाळमधील त्रिवेणी समूहाशी हातमिळवणी केली आहे. नवीन सीकेडी प्रकल्प नेपाळमधील बीरगंज येथे स्थित आहे, जो ब्राझील, थायलंड, कोलंबिया आणि अर्जेंटिना मधील इतर प्रकल्पांमध्ये सामील आहे.

भारतात क्लासिक 350 किंमत

रॉयल एन्फिल्ड क्लासिक 350 ही भारतातील क्रूझर बाईक आहे, जी 7 व्हेरियंट आणि 11 रंगांमध्ये येते. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 मध्ये 349 सीसीबीएस6 इंजिन आहे जे 20.2 बीएचपी पॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 मध्ये फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेकसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे. या क्लासिक 350 बाईकचे वजन 195 किलो ग्रॅम असून त्याची फ्यूल टँक क्षमता 13 लिटर आहे. भारतात या बाईकची एक्स शोरूम किंमत 1,93,500 रुपयांपासून सुरू होते आणि एक्स-शोरूम 2,30,000 रुपयांपर्यंत जाते. क्लासिक 350 ची टक्कर जावा 350 आणि होंडा हनेस सीबी 350 शी आहे. ही बाईक जवळपास 20-30 किमीचे मायलेज देते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.