KKR vs PBKS : नंबर 5 आणि 7 आमनेसामने, पंजाब किंग्सचा केकेआरविरुद्ध बॅटिंगचा निर्णय
GH News April 26, 2025 10:09 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 44 व्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमेनसामने आहेत. हा सामना केकेआरच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात ईडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. पंजाब किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयस अय्यर याने अजिंक्य रहाणे याच्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केकेआरचे गोलंदाज पंजाबला आपल्या घरच्या मैदानात किती धावांवर रोखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने

पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांची IPL 2025 मध्ये आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी 15 एप्रिलला दोन्ही संघामध्ये लढत झाली होती. तेव्हा पंजाबने इतिहास घडवला होता. पंजाबने केकेआर विरुद्ध आयपीएल इतिहासातील निच्चांकी धावसंख्येचा बचाव केला होता. पंजाबने 112 धावांचा पाठलाग करायला आलेल्या केकेआरला 95 रन्सवर गुंडाळलं होतं. त्यामुळे आता केकेआरचा पंजाबचा धुव्वा उडवत मागील अपमानजनक पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), नेहल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.