भिवंडीत १८ अनधिकृत शाळा
भिवंडी, ता. २६ (वार्ताहर) : महापालिका क्षेत्रात तब्बल १८ प्राथमिक शाळा अनधिकृत आहेत. या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊन त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
रॉयल इंग्रजी शाळा, नोबेल इंग्रजी शाळा, अलरजा उर्दू प्राथमिक शाळा, मराठी प्राथमिक शाळा टेमघर, इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक शाळा टेमघर, द लर्निंग प्राथमिक शाळा, एकता इंग्रजी पब्लिक शाळा, फातमा नगर नागांव, एकता उर्दू पब्लिक शाळा, ए आर रेहमान उर्दू प्राथमिक शाळा, जवेरिया उर्दू प्राथमिक शाळा, विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा,
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम इंग्रजी प्राथमिक शाळा, अलहिदाया पब्लिक प्राथमिक शाळा, तहजीब इंग्रजी प्राथमिक शाळा, इकरा इस्लामिक मकतूब शाळा, कैसर बेगम इंग्रजी शाळा, फरहान इंग्रजी प्राथमिक शाळा, गीतांजली माध्यमिक शाळा अशा भिवंडी पालिका क्षेत्रांत अनधिकृत शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत.
पालिका क्षेत्रात असलेल्या अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली असून अशा शाळांवर लवकरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाच्या प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.