पहलगाम हल्ल्यानंतर देशात संताप व्यक्त होत आहे. भारताने आता पाकिस्तानबरोबर स्ट्रेटेजिक पावले उचलली आहेत. सिंधू नदीचे पाणी वाटप करार रद्द केला आहे. पाकिस्तानी व्हीसा रद्द केला आहे. तर पाकिस्तानातील भारतीयांना आता ते लोक परत पाठवत आहेत. परंतू त्यातही पाकिस्तान आता आपली हेकनी कायम ठेवली आहे. तेथील भारतीयांना बॉर्डरवरुन क्रॉस करताना अनेक चित्र अटी पाकिस्तानने घातल्या आहेत.
पाकिस्तानात आता 450 हून अधिक भारतीय नागरिक गेल्या तीन दिवसात वाघा बॉर्डरवरुन भारतात मायदेशी परतले आहेत. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थिती आणि व्हीसा रद्द झाल्यानंतर भारतीयांना आता आपल्या देशात परतणे भाग पडले आहे. शनिवारी तर २३ भारतात परत आले आहेत. हे पाकिस्तान सुपर लीग ( PSL ) 2025 शी संबंधित कर्मचारी होते. शनिवारी तर सीमा पार करणाऱ्या भारतीयांची एकूण संख्या अजून कळलेली नाही.
गेल्या तीन दिवसात सुमारे १०० भारतीय लोक मायदेशी परतले आहे. शुक्रवारी तर ३०० भारतीय नागरिक वाघा बॉर्डरवरुन भारतात आले आहेत. शनिवारी २३ हून अधिक भारतीय आपल्या देशात परत आले आहेत.याच दरम्यान २०० पाकिस्तानी नागरीक देखील भारतातून पाकिस्तानात परतले आहेतत. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपर्यंत अतिरेक्यांच्या गोळीबारात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातून बहुतांश पर्यटक आहेत. केंद्र सरकारने या हल्ल्याचा कट सीमापार पाकिस्तानात शिजल्याचे समजल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचे सल्लागाराला निलंबित केले आहे. सिंधु पाणी वाटप करार रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर अटारी – वाघा बॉर्डर चौकी तडकाफडकी बंद केली आहे.
भारतीय वंशाच्या काही शीख कुटुंबांना मात्र वाघा बॉर्डरवरुन भारतात प्रवेश नाकारण्यात आला आहे. लोहार पासून सुमारे ८० किलोमीटर दूर ननकाना साहीब येथे राहाणाऱ्या भारतीय मूळ असलेल्या कॅनेडीयन शीख कुटुंबांना मात्र प्रवेश नाकारला आहे. त्यांना दुबईच्या मार्गे विमान प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गुरुवारी १०५ भारतीय आणि २८ पाकिस्तानी नारिकांना त्यांच्या-त्यांच्या देशात जाण्याची परवानगी दिली आहे.