नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून संकेत | Local Body Election
Saam TV April 27, 2025 06:45 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाने तयारी सुरू केली आहे, आणि या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता अशी शक्यता कमी झाली आहे. या निवडणुका दिवाळीच्या आसपास म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या "सशक्त संघटन" कार्यक्रमात खासदार यांनी उपस्थिती दर्शवली, तसेच महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला हवं ते यश मिळालं नसल्याचं कबूल केलं. तसेच अजितदादा यांच्या नेतृत्वावर टीका झाल्याबद्दल आपला दृष्टिकोन मांडला.

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश

तटकरे म्हणाले की, 'अजितदादा यांचं नेतृत्व महाराष्ट्रात स्वीकारलं जाणार नाही असं वातावरण तयार केलं गेलं. कार्यकर्त्यांमध्ये अजित दादांबद्दल एक विश्वास होता, पण आपण विधानसभेत आपली ताकद दाखवली. लोकसभेत यश मिळालं नसलं तरी, विधानसभेत घवघवीत यश मिळालं', असं तटकरे म्हणालेत.

योजनांना यशस्वी बनवलं

तसेच तटकरेंनी योजनेवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिलं. "लाडकी बहीण" आणि "लेक योजना" या योजनांनर टीका करण्यात आली, पण अजितदादांनी त्या योजनांना यशस्वी बनवलं", असं सुनील तटकरेंनी योजनांना मिळालेल्या भाष्य केलं.

५० टक्के महिलांना संधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल बोलताना तटकरे म्हणाले, 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला जनतेत विश्वास निर्माण करायचं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के महिलांना संधी देण्याचा निर्धार' तटकरेंनी व्यक्त केला आहे.

कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं

तटकरेंनी निवडणुकीतील मुख्य मुद्दे मांडले आणि म्हणाले की, 'जनतेच्या मनात विविध प्रश्न निर्माण होतात, तेव्हा आपण पक्ष म्हणून लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि ते सोडवले पाहिजे. आगामी निवडणुकीत आपण महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत', असं तटकरे म्हणालेत. तसेच 'प्रशासनावर आज अजित दादांची पकड आहे, म्हणून कार्यकर्त्यांनी जोमाने आगामी निवडणुकांसाठी पुढे येऊन कामं करावे,' असं म्हणत तटकरेंनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.