Maharashtra News Live Updates: भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या हद्दीत स्वागत कंपाउंड परिसरात फर्निचर गोदामाला भीषण आग
Saam TV April 27, 2025 06:45 PM
Bhiwandi: भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या हद्दीत स्वागत कंपाउंड परिसरात फर्निचर गोदामाला भीषण आग

10 ते 12 गोदाम जळून खाक

पहाटे चार च्या सुमारास लागलेली आग पंधरा ते सोळा तासापासून 30 तास उलटूनही धूमसत आहे

आगीचे कारण अस्पष्ट असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी

आग लागलेली चार मजली इमारत काल कोसळली

गोदामात लाकडी प्लाऊड, फॉम, रेग्जिन, सेल्युशन चा मोठ्या प्रमाणात साठा

पाण्याची कमतरता असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला अडचण आली

या भागात मोठ्या प्रमाणात गोदाम पट्टा असून देखील फायर फायटिंग ची सुविधा तसेच पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने अडचण

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून 2 ते 3 तास लागण्याची शक्यता

ही आग अंडर कंट्रोल असून आता वाढत नाही आणि नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जवानांचे सुरू आहे

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदानाच्या वेळी दोन गटात वाद

सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये झाली शाब्दिक बाचाबाची,प्रसंगी एकमेकांच्या अंगावर ही गेले धावून

पोलिसांनी तात्काळ मध्ये पडत वाद मिटवण्याचा केला प्रयत्न

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन माजी संचालकांमध्ये झाला वाद

श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल विरुद्ध श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलमध्ये सुरूय थेट लढत

सुरेश हसापुरे आणि अप्पासाहेब पाटील या दोन्ही उमेदवारांच्यामध्ये मतदानाच्या करणावरून झालाय वाद

दरम्यान,या निवडणूकीमुळे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळींची प्रतिष्ठा लागली आहे पणाला..

Local Train: बदलापूरहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये गोमांस तस्करी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तिघांना पकडून दिले कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

कल्याण रेल्वे स्टेशन ला तिघांना उतरवून दिल कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यानी गोंधळ

कल्याण रेल्वे पोलिसांनी केला तपास सुरू

Beed: शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या माजलगावच्या जयमहेश शुगर्सच्या उत्पादीत माल जप्तीचे आदेश

शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या ५ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसी म्हणजेच उत्पादीत माल जप्तीचे आदेश दिले आहेत.

त्यामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील जयमहेश साखर कारखान्याचा देखील समावेश असून या जय महेश साखर कारखान्याने शेतकऱ्यांची १६ कोटी रूपये रक्कम थकविली आहे.

त्यानुसार साखर आयुक्तांनी 25 तारखेला या कारवाईचे आदेश काढले आहेत.

साखर सहसंचालक कार्यालयाकडून अनेक वेळा नोटीस बजावण्यात आल्यानंतरही साखर कारखाना शेतकऱ्यांचे पैसे देण्यास तयार नाही.

तर साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांच्या सुनावण्या घेतल्यानंतर देखील शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आलेली नाही.

यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

अंदारसुल येथे बंद, पाकिस्तानचा ध्वज जाळला

जम्मू-काश्मीर च्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदारसुल येथे सर्व पक्षीय संघटनांनी बंद पुकारला त्यास चांगला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला तसेच सर्व पक्षीय संघटना,हिंदुत्ववादी संघटना तर्फे गावातून निषेध मोर्चा काढत पाकिस्थानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी केली,केंद्र सरकारने पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली

निळवंडे कालव्यांना आवर्तन ऐन उन्हाळ्यात 180 दुष्काळी गावांना दिलासा

निळवंडे धरणाच्या कालव्यांमधून शेती आणि पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने शेकडो गावांना ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे..

नव्याने तयार झालेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून जिल्ह्यातील सहा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात हे पाणी पोहचणार आहे..

सध्या 11 टीएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात 50 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.. तर 7 टीएमसी क्षमता असलेल्या निळवंडे धरणात 29 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे..

भंडारदरा धरणातून 1300 क्युसेक वेगाने तर निळवंडे धरणातून 2400 क्युसेक वेगाने हे पाणी कालवे आणि प्रवरा नदीपात्रातून हे पाणी लाभक्षेत्राकडे झेपावले आहे..

एकीकडे पाणी टंचाईच्या झळा जाणवत असताना निळवंडे कालव्यांना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी आणि नागरिक सुखावले आहेत

Hingoli Temperature: हिंगोली तापमानाचा पारा 44 सेल्सिअस अंशाच्या जवळ, पपईच्या बागा करपल्या

राज्यात सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा पारा दररोज वाढत आहे, मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या वर्षी 44 सेल्सिअंस तापमानाची नोंद झाली आहे

अशा परिस्थितीत या सगळ्यांचा फटका बागायती पिकांना बसलाय त्यासोबतच फळबागा देखील वाढत्या तापमानामुळे करपून जात आहेत,

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील माळवटा , पळसगाव शिवारात शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या पपईबागा नष्ट होत आहेत, या शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेल्या या बागेतील उत्पन्नाची आता आशा सोडली आहे ,

पाच महिन्यांपूर्वी शेतात लागवड केलेल्या पपई मधून चांगले आर्थिक उत्पन्न होईल अशी आशा या शेतकऱ्यांना होती

मात्र वाढलेलं तापमान आणि त्यामुळे आटलेले पाण्याचे स्त्रोत या शेतकऱ्यांना उध्वस्त करून गेले आहेत

पोलिसांचं खच्चीकरण करून दिलगिरी व्यक्त करणे ही तर सरकारची नामुष्की....! ठाकरे गटाची सरकारवर टीका

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल आक्षेपार्य टीका केली होती आणि आज याबाबत त्यांनी विधानावर ठाम असून पोलिसांची दिलगिरी मागतो असे स्पष्ट केलं यावर ठाकरे कटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्यात की ही सरकारची नामुष्की आहे आधी पोलिसांचा खच्चीकरण करायचा आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची यावर खरंतर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली.

Walmik Karad: संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला पॅनिक अटॅक आल्याची माहिती

दुपारच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी.

आरोपी वाल्मिक कराडला डॉक्टरांनी रक्त चाचण्या करण्याचा दिला सल्ला.

रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार होणार आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सध्याला बीडच्या जिल्हा करागरामध्ये असून त्याची प्रकृती दुपारी बिघडली आहे.

तर अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्यावरती बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासण्या केल्या आहेत. त्याचबरोबर काही प्राथमिक उपचार केले आहेत.

ब्लड सॅम्पल आणि त्याचबरोबर काही वैद्यकीय तपासण्या केल्या असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Pune: पुण्यात आज "पुणे अर्बन डायलॉग" या परिसंवादाच आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत परिसंवाद सुरू

पुणे महानगरपालिकेच्या अवधूत महोत्सवाच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेतर्फे परिसंवादचा आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील अनेक अधिकारी उपस्थित

Pune : पुरंदर विमानतळासाठी निश्चित केलेल्या जमिनीची खरेदी विक्री आता बंद करण्यात येणार आहे

रंदर तालुक्यातील सात गावांमध्ये विमानतळ होणार असल्याने त्या गावांतील जमिनीचे संपादन करण्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

त्यामुळे आता सात गावांतील संपादित होणाऱ्या जमिनींची खरेदी-विक्री बंद होणार आहे. अध्यादेश प्रसिद्ध झाल्यानंतर सूचना व हरकती नोंदविण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्यात येणार आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या सात गावांतील २६७३ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार आहे.

त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने एकेक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे.

पुण्यातील बावधन परिसरात खासदार सुप्रिया सुळे यांचा पायी मोर्चा

पुण्यातील बावधन परिसरात खासदार सुप्रिया सुळे यांचा पायी मोर्चा

बावधन परिसरातील स्थानिक मुद्दे यांचा आढावा घेण्यासाठी स्वतः उतरल्या रस्त्यावर

सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मोर्चाला सुरुवात

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

पोलिसाप्रती आक्षेपऱ्या वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्या बाबत आ संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे..

या बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता त्यांच्याशी बोलणं झाल आहे ..

बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाचा छापा

मिरज शहरातील मालगाव रस्त्यावरील खोतनगर येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला.

याठिकाणाहून अभिजित विलास लोहार याला अटक केली आहे. तर त्याच्याकडून पाच सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार, पाईप असा २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे व अपर अधीक्षक रितू खोखर यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला बेकायदा गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर छापे मारण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे एक पथक कारवाईसाठी सज्ज केले होते. पथकातील कर्मचारी यांना माहिती प्राप्त झाली की अभिजित लोहार हा मिरजेतील खोत मळ्यातील घराबाहेर उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरचा साठा व गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने लोहार याच्या घरावर छापा मारला. झडती घेतल्यानंतर शेडमध्ये पाच गॅस सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार, रेग्युलेटर व रोख १२०० रूपये असा २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

त्याच्याकडे गॅस सिलिंडर बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस कर्मचारी अनंत कुडाळकर यांनी याबाबत फिर्याद दिली.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या प्रस्तावित आराखड्याचा आढावा घेणार असून, जागेची पाहणी देखील करणार आहेत.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रवेश आयोजित कोकण महाराष्ट्र-महाराष्ट्र गौरव रथयात्रा प्रारंभ यावेळी करण्यात येईल.

दुपारी कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे. सायंकाळी हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.

Solapur: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान

- बाजार समितीच्या 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात,उद्या होणार मतमोजणी

- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळी आठ वाजल्यापासून होणार सुरुवात

- श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनल मध्ये होणार थेट लढत

- सोलापूर शहरात सात मतदान केंद्र तर उत्तर सोलापूर तालुक्यात दोन आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात चार मतदान केंद्र असणार

- यामध्ये 11 सहकारी संस्था, 4 ग्रामपंचायत, 2 व्यापारी गट आणि ह1 माल तोलार गटाचा असणार आहे समावेश

- या निवडणुकीत भाजपा आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलची प्रतिष्ठा लागली आहे पणाला

- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलमध्ये भाजप आणि काँग्रेसने युती केल्यामुळे निवडणुकीकडे लागले आहे राज्याचे लक्ष..

Maharashtra Politics: यवतमाळात शिवसेना काढणार टॅक्टर मोर्चा

सत्तेत येण्यासाठी महायुतीने निवडणुकीत वारेमाप आश्वासने दिली शेतकऱ्यांना कर्जमाफीचे वचन दिले शेतकरी अडचणीत असताना आता मात्र सत्ताधाऱ्यांनी वचनपूर्तीऐवजी कर्जमाफी होणार नसल्याचे जाहीर केले. याचा जाब विचारण्यासाठी नऊ मे रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने यवतमाळ शहरात ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती खासदार संजय देशमुख आणि आमदार संजय देरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुरूम येथे पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी धाराशिवच्या मुरुम शहरातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत श्रद्धांजली सभा घेतली. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व जातीधर्मातील नागरिक उपस्थित होते. सर्वांनी हल्ल्याचा निषेध करत देशाच्या एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन समस्त मुरुम शहरवासीयांनी केले होते.

वाघोलीतील बियर शॉपीविरोधात नागरिकांचे आंदोलन; बेकायदेशीर परवाना रद्द करण्याची मागणी

गगन अदिरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वाघोली येथील Booze Craving Beer And Wine Shop या बियर शॉपीला दिलेला बेकायदेशीर परवाना तत्काळ रद्द करण्यात यावा, कारण यामुळे महीला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष संदिप सातव आणि नागरिक यांच्या वतीने बियर शॉपी समोर आंदोलन करण्यात आले.

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख 16 हजार 731 अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अनुदान मिळावे यासाठी म्हणुन महाडीबीटीवर सुरू केलेली सोडत पध्दत बंद केली आहे.

माञ कृषी विभागाने अर्ज निवड प्रक्रीयेची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही नविन पध्दत लागु केली असुन त्या अंतर्गत प्रलंबित अर्जाची प्राधान्याने निवड केली जाणार आहे.

त्यामूळे धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख 16 हजार 731 अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.दरम्यान प्रलंबित सर्व अर्ज वैध ठरणार आहेत.

तारखेनुसार या अर्जांची अनुदानासाठी निवड होईल हे अर्ज संपल्याशिवाय नविन अर्ज निवडण्यास सुरूवात होणार नाही.

नविन अर्जांची प्रक्रीया सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना कळविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिलीय.

Ayodhya: अयोध्याला तीर्थ दर्शनासाठी कोकणातून पहिली ट्रेन रवाना

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरुन 800 ज्येष्ठ नागरिकांना अयोध्याला तीर्थ दर्शनासाठी घेऊन जाणारी कोकणातील पहिली रेल्वे रवाना झाली.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय.

दरम्यान आपल्या घरातलं कुटुंब हे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघालेलं आहे. आपल्याला आशीर्वाद मागण्यासाठी हे सर्वजण निघालेले आहेत.

अशा पध्दतीची वागणूक ही सर्व ज्येष्ठांना मिळाली पाहिजे. कुठच्याही ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार नाही, त्यांना कोणतीही कमतरता भासणार नाही, याची काळजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी असं सांगून, सुरक्षित जा, सुरक्षित या, अशा शुभेच्छा पालकमंत्री डॉ. सामंत यांनी भाविकांना दिल्या.

सांगली व मिरज शासकीय रुग्णालयाला प्रदूषण केल्या प्रकरणी हरित न्यायालयाकडून 4 कोटी 68 लाखांचा दंड

सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयाला प्रदूषण प्रकरणी हरित न्यायालयाकडून चार कोटी 68 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

येत्या दोन महिन्यात सदर दंडाची रक्कम प्रदूषण महामंडळाकडे जमा करण्याचे निर्देश देखील हरित न्यायालयाकडून सांगली व मिरज शासकीय रुग्णालयाला देण्यात आले आहेत.

सांगली व मिरज शासकीय रुग्णालयाकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याबाबतची याचिका सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडीकर व ओंकार वांगीकर यांच्याकडून दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर निर्णय देताना हरित न्यायालयाकडून सांगली व मिरज शासकीय रुग्णालयाला दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडीकर आणि वकील ओंकार वांगीकर यांनी दिली आहे.

Ratnagiri: वानरांचा उपद्रव टाळण्यासाठी एनिमल आऊट

सिंधुरत्न योजनेतून कृषी विभागाने एनिमल आऊट फवारणी औषध आणि फळमाशी रक्षक सापळे उपलब्ध काजरघाटीतील शेतक-यांना करून दिले आहेत.

त्याचं वाटप तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांच्या हस्ते करण्यात आलं. पोमेंडी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते..

वानर आणि माकडांचा होणारा उपद्रव टाळण्यासाठी कृषी विभागाकडून सध्या विविध योजना राबवण्यात येत आहेत.

बोरी धरणात पुरेसा पाणीसाठा असुनही नळदुर्गकरांना दहा दिवसाआड पाणीपुरवठा

धाराशिव- नळदुर्ग येथील बोरी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही नळदुर्ग करांना आणीबाणीचा सामना करावा लागत आहे.

बोरी धरणातुन तुळजापूर व अणदुर शहराला पाणीपुरवठा केला जातो.माञ नळदुर्ग शहराला सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

नळदुर्ग येथे मागील 30 वर्षात एकही जलकुंभ बांधण्यात आले नाही.तर दुसरीकडे नळदुर्ग शहराची लोकसंख्या वाढत गेली

माञ त्यादृष्टीने पाणी पुरवठ्याची योजना राबविण्यात आली नाही दरम्यान शहरात सध्या अमृत 2.0 या 43 कोटी रुपयांच्या योजनेचे काम सुरू लवकर पाणीप्रश्न मार्गी लागेल अस प्रशासनाकडुन सांगण्यात येतय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.