आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने विजयी घोडदौड कायम राखली आहे. मुंबईने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात रविवारी 27 एप्रिलला घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सवर एकतर्फी आणि सहज विजय मिळवला. मुंबईचा हा या मोसमातील सलग पाचवा विजय ठरला. त्यामुळे मुंबईचा प्लेऑफचा मार्ग आणखी मोकळा झाला आहे. मुंबईने लखनौला विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी लखनौला 161 धावांवर ऑलआऊट केलं. मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 51 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सूर्या आणि बुमराह या दोघांनी मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मात्र कर्णधार हार्दिक पंड्या याने दुसऱ्याच 2 खेळाडूंची नावं घेतली.
“ज्या पद्धतीने आम्हाला लय प्राप्त झाली आहे, त्यामध्ये प्रत्येक खेळाडू आपलं योगदान देत आहे. प्रत्येक खेळाडू संधी घेत आहे. एक वेळ असं वाटत होत की आम्ही जास्त विकेट्स गमावल्या आहेत. मात्र कॉर्बिन बॉश आणि नमन धीर या जोडीने अखेरच्या क्षणी निर्णायक खेळी केली. गेम केव्हा किल करायचा हे आम्हाला माहित आहे”, असं हार्दिकने म्हटलं.
नमन धीर आणि कॉर्बिन बॉश या दोघांनी अखेरच्या क्षणी निर्णायक भूमिका बजावली. दोघांनी छोटेखानी मात्र गेमचेंजर खेळी केली. नमनन 11 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 25 रन्स केल्या. तर कॉर्बिन बॉश याने 10 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने 10 रन्स केल्या. या दोघांनीा केलेल्या एकूण 45 धावांच्या योगदानामुळे मुंबईला 200 पार पोहचता आलं. त्यामुळे लखनौसमोर 216 धावांचं आव्हान ठेवता आलं.
मुंबईकडून या दोघांआधी सूर्याने 28 बॉलमध्ये 4 फोर आणि तेवढ्याच सिक्ससह 54 रन्स केल्या. तर ओपनर रायन रिकेल्टन याने 32 चेंडूत 6 चौकार आणि षटकारांच्या मदतीने 58 धावा जोडल्या. त्यामुळे मुंबईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 215 धावा करता आल्या.
मुंबईच्या विजयाचे नायक
त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडली. मात्र यात बुमराहने निर्णायक भूमिका बजावली. एकट्या बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे लखनौ 20 ओव्हरमध्ये 161 रन्सवर ऑलआऊट झाली. मुंबईने अशाप्रकारे 54 धावांनी सामना जिंकला.