डोंबिवली, (जि. ठाणे) - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरहून गोव्याला गेले, तेथून कुडाळमध्ये गेले. तिथे जल्लोष केला. हार-तुरे स्वीकारले गेले, फटाके फोडले गेले. तेव्हा त्यांच्यातील संवेदना मेली होती का? तिथे अश्रू ढाळायचे आणि कुडाळला आनंदोत्सव साजरा करायचा, अशा टीका शिवसेना (ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी केली.
पहलगाम येथील हल्ल्यात डोंबिवलीमधील संजय लेले, अतुल मोने व हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाइकांची विनायक राऊत यांनी भेट घेतली. यावेळी राऊत म्हणाले, ‘कलम ३७० हटविल्यानंतरही काश्मीरमध्ये दहशतवाद आहेच हे या हल्ल्यावरून सिद्ध झाले आहे. हे केंद्र सरकारचे अपयश आहे.
दुर्दैवाने घरातील कर्त्या पुरुषांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. केंद्र सरकारच्या बेजबाबदार आणि हलगर्जीमुळे दहशतवाद्यांना त्या ठिकाणी पोहोचणे शक्य झाले.’