भारताला धमकवणाऱ्या पाक लष्करप्रमुख असीम मुनीरनंतर बिलावल भुट्टो परिवाराचे पाकिस्तानातून पलायन
GH News April 28, 2025 01:08 PM

Pahalgam Terror Attack Terrorists: ‘सिंधू पाणी करार रद्द केला तर सिंधू खोऱ्यात रक्ताच्या नद्या वाहतील’, अशी भारताला धमकी देणाऱ्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो याच्या परिवाराने पाकिस्तान सोडला आहे. त्यापूर्वी पाकिस्तान लष्कराचे प्रमुख असीम मुनीर याच्या परिवाराने देश सोडत कॅनडात आश्रय घेतला. भारताला धमक्या देणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या परिवाराने पाकिस्तानातून पलायन केले आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताकडून करण्यात येणाऱ्या कारवाईची प्रचंड धास्ती पाकिस्तानने घेतली आहे.

भारताने पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कठोर पावले उचलली होती. सिंधू नदी पाणी करार रद्द केला होता. त्यामुळे पाकिस्तानातील पीपीईचे अध्यक्ष बिलावल भुट्टो चांगलेच संतापले होते. पाकिस्तानचे पाणी थांबवले तर सिंधू नदीत रक्त वाहील, अशी धमकी भुट्टो याने भारताला दिली होती. त्या धमकीच्या एका दिवसानंतरच त्याच्या परिवाराने पाकिस्तान सोडल्याचे वृत्त आले आहे. 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी भुट्टो परिवार पाकिस्तान सोडून कॅनडात पळाला आहे.

पाकिस्तानाने भारताच्या कारवाईची प्रचंड धास्ती घेतली आहे. पाकिस्तानी लष्करातील अधिकाऱ्यांचे मनौधर्य खचले आहे. यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या परिवाराला विदेशात पाठवून दिले आहे. त्यात पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचाही समावेश आहे. एका प्राइव्हेट जेटने त्यांच्या परिवाराने पाकिस्तान सोडले आहे. तसेच इतर काही लष्कारी अधिकाऱ्यांनाही त्यांच्या परिवारास पाकिस्तानातून दुसरीकडे पाठवले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. संपूर्ण देशातील राजकीय पक्षांनी सरकारसोबत असल्याचे ग्वाही दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना कल्पनाही करणार नाही, असा धडा शिकवला जाणार असल्याचे म्हटले आहे. त्याची चांगलीच धास्ती पाकिस्तानने घेतली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कठोर संदेश देत अरबी समुद्रात आयएनएस सूरतवरुन एका क्षेपणास्त्राची चाचणी केली. तसेच जगातील कोणत्याही भागात लपलेल्या हल्लेखोर दशतवाद्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.