कलमठ प्रबुद्धनगरात आज गौतम बुद्ध, आंबेडकर जयंती
esakal April 29, 2025 12:45 AM

कलमठ प्रबुद्धनगरात आज
गौतम बुद्ध, आंबेडकर जयंती

कणकवली,ता. २८ ः प्रशिक बौद्ध सेवा संघ कलमठ, अवंतिका स्वयंसहाय्यता समुह प्रबुद्धनगर, सखी स्वयंसहाय्यता समुह कलमठ, समता स्वयंसहाय्यता समुह कलमठच्या संयक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव उद्या (ता.२९) समाज मंदिर पटांगण कलमठ, प्रबुद्ध नगर येथे आयोजित केला आहे.
सकाळी ९ वाजता पंचशिल ध्वजवंदन आणि बुद्ध पूजा पाठ, सायंकाळी ४ वाजता फनी गेम्स, खेळ पैठणीचा कार्यक्रम. रात्री ९ वाजता अभिवादन सभा होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार कासले असतील. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य श्रेयश चिंदरकर, इफत शेख, गजराना शेख, जिजाऊ ग्रामसंघ कलमठ अध्यक्ष तन्वीर शिरगावकर, प्रमुख मार्गदर्शक डॉ. व्ही. जी. कदम, संजना ताबे, प्रज्ञा कदम, अनिता बनसोडे उपस्थित राहणार आहेत. रात्री १० वाजता बुद्ध-भिम गीते, रेकॉर्ड डान्स आणि हिंदी मराठी गीतांचा नजराणा ‘भिम जल्लोष’ होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.