Nanded Crime : दोन महिन्यापासून मुलगा बेपत्ता, आता सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; आई-वडिलांचा टाहो
Saam TV April 29, 2025 12:45 AM

नांदेड : नांदेडच्या जिल्ह्यातील किनवट गोकुंदा येथून दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अखेर मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. किनवट–राजगड या राष्ट्रीय महामार्गालगत खोदलेल्या नालीमध्ये दुचाकीसह पडलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणाचं नाव सचिन गंगाधर आरपेल्लीवार असं आहे. सचिन हा २७ फेब्रुवारीच्या सकाळपासून कामानिमीत्त घराबाहेर पडला होता. परंतु तो घरी परत न आल्याने नातेवाईकांनी किनवट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी या युवकाचा सोध सुरू केला होता. सोमवारी सकाळी पोलिसांना किनवट राजगड राष्ट्रीय महामार्गालगत खोदलेल्या नालीमध्ये दुचाकीसह पडलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

 दिवसाढवळ्या नाशिकच्या रस्त्यावर रक्तरंजित थरार

दरम्यान, मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कामटवाडे परिसरात दिवसाढवळ्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

किरण चौरे असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर, आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या कामटवाडे परिसरात दोन गटात दिवसाढवळ्या वाद सुरू होता. दोन गटातील वादानंतर विधीसंघर्षग्रस्त मुलाच्या डोक्याता दगड घालण्यात आला. तसेच त्याला मारहाणही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.