'पंतप्रधान मोदी फक्त मोठ्या गोष्टी बोलतात, मल्लिकार्जुन खरगे यांचा हल्लाबोल
Webdunia Marathi April 29, 2025 03:45 AM

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आणि ते म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत हे देशाचे दुर्दैव आहे.

ALSO READ:

मिळालेल्या माहितीनुसार खरगे आज येथे 'संविधान वाचवा' रॅलीला संबोधित करत होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करताना ते म्हणाले, आपल्या देशाचे दुर्दैव आहे की सर्व पक्षांचे लोक बैठकीला आले पण मोदीजी आले नाहीत.ते म्हणाले की ही लज्जास्पद बाब आहे.

ALSO READ:

ते म्हणाले, "जेव्हा देशाचा स्वाभिमान दुखावला गेला तेव्हा तुम्ही बिहारमध्ये निवडणूक भाषणे देत राहिलात पण तुम्ही दिल्लीत येऊ शकला नाहीत. दिल्ली तुमच्यासाठी बिहारपासून दूर आहे का? असा प्रश्न खर्गे यांनी उपस्थित केला.


Edited By- Dhanashri Naik

ALSO READ:


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.