IDBI Bank Q4 Results : आर्थिक वर्षात ७५१५ कोटींचा विक्रमी नफा, भागधारकांसाठी लाभांशही जाहीर
ET Marathi April 29, 2025 12:45 PM
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक आयडीबीआय बँकेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि पूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी-मार्च या चौथ्या तिमाहीत आयडीबीआय बँकेचा नफा वार्षिक आधारावर 26 टक्क्यांनी वाढून 2,051 कोटी रुपयांवर पोहोचला. तिमाही निकाल जाहीर करता आयडीबीआय बँकेने आपल्या भागधारकांना खूशखबर दिली आहे. बँकेने भागधारकांसाठी प्रति शेअर २.१० रुपये लाभांश जाहीर केला आहे . एकूण उत्पन्न जानेवारी ते मार्च २०२५ पर्यंत आयडीबीआय बँकेने एकूण ९,०३५ कोटी कमावले. या उत्पन्नातून बँकेने कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिल, ठेवी इत्यादी गोष्टींवर ५,८४० कोटी रुपये खर्च केले. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेला १,६२८ कोटी रुपयांचा नफा झाला होता. दरम्यान, सोमवारी आयडीबीआय बँकेचा शेअर्स वधारून ८२.५६ रुपयांवर बंद झाला. आर्थिक वर्षातील नफा२०२५ या आर्थिक वर्षात बँकेला ७,५१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. नफा वार्षिक आधारावर ३३ टक्क्यांनी वाढला आहे. २८ एप्रिल रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ऑपरेटिंग नफा १६ टक्क्यांनी वाढून ११,०७९ कोटी रुपये झाला आहे. तर निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) ४.५६ टक्के होता. या कालावधीत, कंपनीचा मालमत्तेवरील परतावा (ROA) १.९८ टक्क्यांपर्यंत वाढला. त्याच वेळी, इक्विटीवरील परतावा (ROE) 20.15 टक्क्यांपर्यंत वाढला. या कालावधीत, बँकेचा खर्च ते उत्पन्न गुणोत्तर ४३.३३ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. एकूण व्यवसायआयडीबीआय बँकेचा व्यवसाय (ठेवी आणि निव्वळ कर्ज) आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार आहे. यामध्ये एकूण ठेवी १२ टक्क्यांनी वाढून ३,१०,२९४ कोटी रुपये झाल्या आहेत आणि निव्वळ कर्ज १६ टक्क्यांनी वाढून २,१८,३९९ कोटी रुपये झाले आहेत. एनपीए घसरला बँकेचा एकूण एनपीए वार्षिक आधारावर ४.५३ कोटी रुपयांवरून २.९८ कोटी रुपयांवर घसरला आहे. त्याच वेळी, निव्वळ एनपीएमध्ये ०.१५ टक्क्यांची थोडीशी सुधारणा झाली आहे. बँकेचा प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो आणखी मजबूत झाला आहे आणि तो ९९.४८ टक्के झाला आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.