India vs Pakistan : पाकिस्तानचे हे 3 विभाग रडारवर, घाबरलेल्या शहबाज सरकारने इमर्जन्सीमध्ये उचललं असं पाऊल
GH News April 29, 2025 02:08 PM

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे नेते, विभाग आणि क्षेत्र दहशतीच्या सावटाखाली आहेत. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे, त्यामुळे पाकिस्तानच टेन्शन आणखी वाढलं आहे. दहशतवादाचे आश्रय दाते असलेल्या पाकिस्तानचे यावेळी उपचार होणं निश्चित आहे. भारताने सर्वप्रथम सिंधू जल करार स्थगित करुन पाकिस्तानला जखमी केलय. त्याशिवाय भारताने वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेऊन पाकिस्तानच नुकसान केलय. यात पाकिस्तानींना देशाबाहेर काढणं. पाकिस्तानातील युट्यूब चॅनल बंद करणं असे निर्णय आहेत. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सायबर आपातकालीन प्रतिक्रिया टीमने (NCERT) पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चरला निशाणा बनवून सायबर हल्ल्याचा धोका वाढू शकतो असा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी दक्षिण आणि मध्य आशियातील वाढत्या तणावाचा हवाला दिला आहे. एक्सप्रेस न्यूज रिपोर्टने हे वृत्त दिलय.

भारत यावेळी सोडणार नाही, ही चिंता पाकिस्तानला लागून राहिली आहे. म्हणून ते वारंवार आम्ही तयार आहोत, अशी युद्धाची भाषा करत आहेत. भारत यावेळी त्यांना सर्वबाजूंनी मारु शकतो ही भिती त्यांच्या मनात आहे. सोमवारी पाकिस्तान सरकारकडून एक एडवायजरी जारी करण्यात आली. त्यात म्हटलय की, “हॅकर्स पाकिस्तान विरुद्ध सायबर हल्ले सुरु करण्यासाठी सध्याच्या क्षेत्रीय स्थितीचा फायदा उचलू शकतात” “सरकारी संस्था आणि संवेदनशील पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर सायबर हल्ल्याच प्रमुख लक्ष्य असू शकतं” असं एडवायजरीमध्ये म्हटलं आहे.

कोणाला लक्ष्य केलं जाऊ शकतं?

सायबर हल्ल्यामध्ये संरक्षण, आर्थिक आणि मीडिया संस्थांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असं एजन्सीने म्हटलं आहे. हल्लेखोर सुरक्षाप्रणाली तोडण्यासाठी स्पीयर फिशिंग, मॅलवेयर आणि डीपफेक रणनीतीचा अवलंब करु शकतात असं एडवायजरीमध्ये म्हटलं आहे. हॅकर्स गोपनीय म्हणजे पाकिस्तानचे सिक्रेट चोरु शकतात असा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनी संस्थांना सायबर सुरक्षा कवच अधिक मजबूत करण्यास आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्तक राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे सध्या संपूर्ण भारतात संतापाच वातावरण आहे. सर्वच थरातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. पहलगाम हल्ल्यात भारताच्या 26 पर्यटकांची निर्घृण हत्या करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.