काँग्रेसकडून आज नाशिकमध्ये सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. नाशिकमध्ये दर्गा काढण्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेसकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
Pune Police : पुण्यातून 28 लाखांच्या बनावट नोटा जप्तपुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 28 लाख रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
Mumbai Fire : वांद्रे परिसरातील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुमला भीषण आगमुंबईत काल एक मोठी आगीची घटना घडली होती. त्यानंतर आज आणखी एक आगीची घटना समोर आली आहे. वांद्रे परिसरातील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुमला आज भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आगीच्या जळून खाक झाले आहे. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
India Vs Pakistan: काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचा गोळीबारपहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. अशातच आता पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा सीमारेषेवर गोळीबार केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर या सेक्टरमध्ये हा गोळीबार झाला. या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.