Rapper Vedan: खळबळजनक! दोन दिग्दर्शकानंतर आता प्रसिद्ध रॅपरला अटक; धक्कादायक कारण आलं समोर
Saam TV April 30, 2025 12:45 AM

Rapper Vedan Arrested: मल्याळम रॅपर वेदन ऊर्फ एडविन थॉमस याला कोची पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात गांजा साठा जप्त करण्यात आला आहे. वेदन केरळमधील एक प्रसिद्ध रॅपर असून त्याचे अनेक गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते. मात्र अलीकडे त्याच्या वागणुकीबाबत शंका व्यक्त केली जात होती आणि त्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याच्या घरी छापा टाकला. या कारवाईमुळे केवळ संगीतविश्वातच नाही तर सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आले आहे.

कोची शहरातील कलूर परिसरात चा फ्लॅट असून, तिथे पोलिसांनी सोमवारी पहाटे छापा टाकल्यानंतर सुमारे ६ ग्रॅम गांजा आणि 1.5 लाख रुपये जप्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, वेदन गेल्या काही काळापासून अंमली पदार्थांच्या सेवनात गुंतला होता आणि त्याच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रार केली होती. पोलिसांनी नोंदवले की वेदन फक्त गांजा साठवून ठेवत नव्हता, तर तो इतर मित्रांना देखील ते पुरवत असल्याची शंका आहे. त्यामुळे त्याच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिस आता या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याचा तपास करत आहेत. वेदनने गांजा कुठून मिळवला आणि कोणत्या उद्देशाने तो साठवून ठेवला होता, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. ही घटना शी जोडल्या जाणाऱ्या तरुण पिढीवर नकारात्मक परिणाम करू शकते, असा इशारा काही समाजतज्ज्ञांनी दिला आहे.

गेल्या आठवड्यात २ दिग्दर्शकांना अटक केली होती

यापूर्वी २७ एप्रिल रोजी, मल्याळम चित्रपटसृष्टीतील दोन प्रमुख दिग्दर्शक, खालिद रहमान (३५) आणि अशरफ हमजा (४६) यांना कोची येथे हायब्रिड गांजा सेवन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत शालिफ मोहम्मद नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.