DC vs KKR Live: सासऱ्यांनी कौतुक काय केलं, KL Rahul चं भलतंच 'धाडस', संघाला अडचणीत आणले Video
esakal April 30, 2025 05:45 AM

Delhi Capitals vs Marathi Update: कोलकाता नाइट रायडर्सच्या २०४ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्साने ६० धावांवर तीन विकेट्स गमावल्या. फॅफ ड्यू प्लेसिसने अर्धशतक झळकावून KKR ची डोकेदुखी वाढवली होती. त्याला KL Rahul साथ मिळाली असली तर मॅच DC च्या पारड्यात आणखी पडली असती. मात्र, त्याचं धाडस महागात पडले.

KKR चा वेग पाहता ते २२५ धावांपर्यंत जातील असे वाटले होते, परंतु DC च्या गोलंदाजांनी त्यांना ९ बाद २०४ धावांपर्यंत रोखले. मिचेल स्टार्कने टाकलेल्या २० व्या षटकात ३ विकेट्स पडल्या अन् धावांना ब्रेक लागला. सुनील नरीन( २७) व रहमतुल्लाह गुरबाज ( २६) यांनी ४८ धावांची सलामी दिली. अजिंक्य रहाणेने १४ चेंडूंत २६ धावा जोडल्या. वेंकटेश अय्यर ( ७) पुन्हा अपयशी ठरला असला तरी अंगकृष रघुवंशी ( ४४) व रिंकू सिंग ( ३६) यांचा फॉर्म परतणे संघासाठी शुभसंकेत आहे. या जोडीने ६० धावांची भागीदारी केली.

आंद्रे रसेलच्या फटकेबाजीसाठी सारेच उत्सुक होते, परंतु तो १७ धावांवर रन आऊट झाला. स्टार्कच्या २०व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने १०६ मीटर षटकार खेचला. त्यानंतर स्टार्कने सलग दोन चेंडूवर अनुकूल रॉय व रोव्हमन पॉवेलला बाद केले. रसेलच्या धावबाद होण्याने संघाने टीम हॅटट्रिक घेतली.

सामन्यापूर्वी सुनील शेट्टीकडून कौतुक...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या बंगळुरूतील लढतीनंतर लोकेश राहुलने विजयानंतर कांतरा स्टाईल सेलिब्रेशन केलं होतं. त्यावर सुनील शेट्टी म्हणाला, आधी चो नेट प्रॅक्टीस जास्त करायचा आणि आता माझ्यासोबत अॅक्शन डायरेक्टरसोबत फाईट प्रॅक्टीस जास्त करतो. सोबतच आम्ही डायलॉगबाजीही करतो. मस्करी करतोय... मला वाटतं त्याला खेळाचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे तो व्यक्त झाला. जी मजा चौकार-षटकार मारण्यात आहे, ती संयमी खेळ करण्यात नाही, हे त्याला समजलेय.

लक्ष्याचा पाठलाग करताना ला दुसऱ्याच चेंडूवर धक्का बसला. अभिषेक पोरेल ( ४) अनुकूल रॉयच्या गोलंदाजीवर बाद झाला. करुण नायरला (१५) शांत ठेवण्यात वैभव अरोराला यश आले. फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलला ( ७) अती घाई नडली अन् तो रन आऊट झाल्याने दिल्लीची अवस्था ३ बाद ६० अशी झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.