जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला उद्देशून तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. "आम्ही कायमच म्हटलं आहे की दहशतवाद आमच्यासाठी अमान्य आहे. दहशतवाद आमचं आणि तुमचं दोघांचंही नुकसान करत आहे. पाकिस्तानने हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे. मुंबई हल्ला त्यांचा नव्हता, असं त्यांनी म्हटलं, पण नंतर सिद्ध झालं की तो त्यांनीच घडवला होता. पठाणकोट, उरी हल्लाही त्यांनीच केला. कारगिलमध्ये त्यांनी युद्ध सुरू केलं, त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. सुरुवातीला त्यांनी हात झटकले, पण जेव्हा पराभव जवळ आला तेव्हा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडे धावले. शेवटी त्यांनीच कबूल केलं की त्यांनी युद्ध उकरून काढलं होतं. आता वेळ आली आहे – जर मैत्री हवी असेल तर ही धोरणं बंद करावी लागतील. शत्रुता हवी असेल, तर आम्हीही सज्ज आहोत,” असा स्पष्ट इशारा अब्दुल्ला यांनी दिला.
Delhi Live : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी RSS प्रमुख मोहन भागवत यांची भेटराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे दिल्लीतील ७, लोककल्याण मार्ग येथून रवाना झाले, जिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक घेतली. ही भेट नेमकी कशाच्या अनुषंगाने झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भागवत आणि मोदी यांच्यातील ही चर्चा आगामी राजकीय घडामोडी, निवडणुकांतील रणनीती किंवा देशातील सामाजिक विषयांवर केंद्रित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
BSF Live: बीएसएफने जवानाच्या अटकेप्रकरणी पाकिस्तान रेंजर्सकडे तक्रार दाखलपंजाबमध्ये चुकून आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानात गेलेल्या एका जवानाच्या अटकेप्रकरणी सीमा सुरक्षा दलाने (BSF) पाकिस्तान रेंजर्सकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी मंगळवारी दिली. यापूर्वी अशा प्रकारच्या चुकून झालेल्या ओलांडण्याची प्रकरणं दोन्ही देशांनी लवकर निकाली काढली होती. मात्र, यावेळी पाकिस्तानने जवानाच्या स्थितीबाबत किंवा परतीच्या तारखेबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावामुळे पाकिस्तानकडून ही उदासीनता दाखवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Narendra modi live: पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांची ७ लोककल्याण मार्गावर बैठकराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून आगामी राजकीय घडामोडी, राष्ट्रीय सुरक्षेची स्थिती तसेच संघ-सरकार यांच्यातील समन्वय यासंबंधी चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीचे कारण अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नसले तरी, आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी आणि संघाच्या भूमिकेचा विचार करता, ही चर्चा रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची ठरू शकते.
Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात बैठक : सूत्रांची माहितीराष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात बैठक सुरू असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलीय.
Shivsena : ठाण्यात ठाकरेंना धक्का, विभाग प्रमुखाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशठाण्यातले शिवसेना उबाठा गटाचे विभाग प्रमुख प्रीतम रजपूत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. प्रीतम रजपूत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.
Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक संपलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोभाल, सीडीएस आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडले.
Pune Live News : चांदणी चौकात पीएमपीएलचा ब्रेक फेल, दुचाकींसह अनेक गाड्यांना धडकपुण्यात चांदणी चौकातून खाली येत असणाऱ्या पीएमपीएल बसचा ब्रेक फेल होऊन अपघात झालाय. बसने तीन ते चार दुचाकी, एक रिक्षा आणि काही गाड्यांना उडवलंय. अपघातात दोघे जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Live : राजकीय नेत्यांना पैसे खाण्यासाठी शक्तिपीठ मार्ग करायचा; रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोपराजकीय नेत्यांना पैसे खाण्यासाठी आणि निवडणुकीसाठी फंड उभा करण्यासाठी शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, असा थेट आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना तो शेतकर्यांवर लादला जात आहे. या महामार्गासाठी जोर जबरदस्तीने शेतकऱ्यांचा जमिनी घेण्याचा प्रयत्न केला, तर रक्ताचे पाट वाहतील असा इशारा ही तुपकर यांनी दिला आहे.
Live : धुळ्यात तब्बल 605 किलोचा गांजा जप्तधुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत 42 लाख 35 हजार रुपये किंमतीचा 605 किलो गांजा जप्त केला आहे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चिलारे शिवारातील टिटवा रोडवर रविंद्र गणेशा पावरा नावाचा व्यक्ती गांजा साठवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.
Beed Live: बीड परळी रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला अचानर आगबीड परळी रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला अचानर आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दल लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या एक तासाच्या प्रयत्नानंतर आग विझली. मात्र ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Narendra Modi Live: नरेंद्र मोदींच्या घरी बैठकीला सुरुवात, संरक्षण मंत्रीदेखील उपस्थितपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहेत. यासोबतच तिन्ही दलाचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित आहे.
Jammu-Kashmir: जम्मू काश्मीरमधील ४८ पर्यटनस्थळं बंद करण्याचा निर्णयपहलगाव हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील ४८ पर्यटनस्थळं बंद करण्याचा निर्णय जम्मू काश्मीर सरकारने घेतला आहे.
गोदावरी नदीपात्रात पडलेल्या गाईचा महापालिकेच्या खासगी सफाई कर्मचाऱ्यांनी जीव वाचवलागोदावरी नदीपात्रात पडलेल्या गाईचा जीव महापालिकेच्या खासगी सफाई कर्मचाऱ्यांनी वाचवला.
नदी पात्रात वाहून आलेल्या पानवेलींमुळे गाय अडकली होती.
नदी पात्रात पानवेलींमुळे गाईला जमीन समजून चालत गेली, आणि ती नदी पात्रात पडली.
कर्मचाऱ्यांनी त्वरित गाईला बाहेर काढून तिचा जीव वाचवला.
- काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याच्या घटनेचा पौडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला.
- ग्राम सुरक्षा दल, व्यापारी संघ, सकल हिंदू समाज, उत्सव कमिटी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत बसस्थानकाजवळील चौकात पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या आणि झेंडा जाळून संताप व्यक्त केला.
- या निषेध आंदोलनात महिलांनीही सक्रिय सहभाग घेतला.
Pune Live: महिलांच्या स्वच्छतागृहात चोरट्या नजरेने पाहणाऱ्यावर गुन्हा दाखल- विमाननगरमधील एका खासगी कंपनीत महिलांच्या स्वच्छतागृहात लपून पाहणाऱ्या सफाई कामगाराला तरुणींनी रंगेहाथ पकडून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
- अनिल दुकाळे (२५, रा. मांजरी) असे त्याचे नाव असून, या प्रकरणी कंपनीतील २३ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Live Update: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत -देवेंद्र फडणवीसपहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली जाहीर.
Live Update: भजनलाल शर्मा आणि मनोहर लाल खट्टर यांनी जयपूरमध्ये ऊर्जा विभाग आणि नगरविकास विभागाची राज्यस्तरीय घेतली आढावा बैठकराजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जयपूरमध्ये ऊर्जा विभाग आणि नगरविकास विभागाची राज्यस्तरीय आढावा बैठक घेतली.
Live Update: मुबंई पोलिसांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेचा आक्रोश मोर्चामुबंई पोलिसांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेचा आक्रोश मोर्चा
Live Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वितरण प्रणाली सुधारणा करण्याबाबत बैठकउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वितरण प्रणाली सुधारणा करण्याबाबत बैठक
Live : दहावीतील विद्यार्थ्यांना इंग्रजीत नाव लिहिता येईना; उत्तर प्रदेशातील मदराशातील परीक्षणादरम्यान धक्कादायक बाब उघडत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील मदरशातील दहावीमधील विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे नावदेखील इंग्रजीमध्ये लिहिता येत नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा येथील मदरशांना अचानकपणे भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला, तेव्हा येथील शिक्षणाची दयनीय स्थिती लक्षात आली.
‘‘जिल्ह्यातील जामिया गाजिया सय्यदुल उलूम या बडी टकीया येथील नावाजलेल्या मदरशामध्ये रविवारी अचानकपणे भेट देऊन परीक्षण केले असता येथील दहावीतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत त्यांचे आणि त्यांच्या शाळेचे नावही लिहिता येत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले,’’ अशी माहिती अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या वतीने माध्यमांशी बोलताना देण्यात आली.
Live : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटूंबीयांना 50 लाखांचं अर्थसहाय्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटूंबाला 50 लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Sangli Live : तीनपानी जुगार अड्ड्यावर इनाम धामणीत छापा; सहा जण ताब्यात, २ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्तइनाम धामणी (ता. मिरज) येथील बत्तीस माग कारखान्याजवळ चालणाऱ्या तीनपानी जुगार अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतले असून दिग्विजय सुभाष श्रीरंबेकर (रा. मौजेडिग्रज), महेश जिन्नू बिरणे, अक्षय राजेंद्र भोसले, अच्युत गोपाळ नाईक, सुहास कृष्णा कोळी व सतीश महावीर पाटील (सर्व रा. इनामधामणी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सहा मोबाईल, ३ मोटारसायकली, रिक्षासह इतर साहित्य असा २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Live : पाकिस्तानी माजी सैन्याधिकारी हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार22 एप्रिलला पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यातील पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाशिम मुसा हा माजी पाकिस्तानी पॅरा कमांडो या मिशनचा मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं जातंय.
Mumbai Live : डोंबिवलीत दिव्याची पेटती वात अंगावर पडून महिलेचा भाजून मृत्यूघरात देवाची पूजा करत असताना दिव्याची पेटती वात अंगावर पडून डोंबिवली पूर्वेतील पिसवली भागातील एक महिला गंभीररित्या भाजली होती. या महिलेवर डोंबिवली एमआयडीसीतील एका रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ही घटना घडली असून अर्चना धर्मेंद्र कुमार (वय 48) असे मयत महिलेचे नाव आहे. या मृत्युप्रकरणी महिलेचा पती धर्मेंद्र कुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून घेत पुढील तपास चालू केला आहे.
Nashik Live: नाशिकमध्ये वणी-नांदुरी रस्त्यावर भाविकांच्या वाहनाला अपघातनाशिकमध्ये वणी-नांदुरी रस्त्यावर भाविकांनी भरलेला टेम्पो उलटला. 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. वळणावर अंदाज न आल्याने ट्रक उलटल्याची माहिती दिली. जखमींवर वणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Mumbai Live: राणीच्या बागेतील पेंग्विन कुटुंब झालं 21 सदस्यांचं; पेंग्विनच्या जोड्यांना झाली आणखी तीन पिल्लंभायखळा येथील राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनच्या जोड्यांना आणखी तीन पिले झाली आहेत..नॉडी, टॉम आणि पिंगू.
Solapur Live: जावयानेच केला सासऱ्याचा खून, कौटुंबिक वादातून हत्याकांडमोहोळमध्ये जावयानेच केला सासऱ्याचा चाकू भोसकून खून केला. रामहिंगणे गावातील धक्कादायक घटना. कौटुंबिक वादातून जावयाने सासू, सासरे आणि मेव्हणा यांच्यावर चाकूने केले वार, यामध्ये सासू आणि मेव्हण्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत तर सासऱ्याचा मृत्यू झाला.
Pahalgam Attack Live: पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना ५० लाखांचं अर्थसहाय्य देणारपहलगाम हल्ल्यात मृत झालेल्या महाराष्ट्रामधील मृतांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलीये.
Live : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्र्याचा तिडा पाच वर्ष सुटणार नाही, रोहित पवारांचा दावानाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला संघर्ष थांबायचं नाव घेत नाही! अशात आमदार रोहित पवारांनी या वादात उडी घेतलीय. हा तिडा आज, उद्या, पुढची पाच वर्षेही हा तिढा सुटणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा तिढा मान्य नसला, तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचं पालकमंत्रिपद आपल्या ताब्यात ठेवण्याचा निर्धार केल्याचं रोहित पवारांनी ठणकावून सांगितलं आहे.
Pune live : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातपुणे अहिल्यानगर हायवेवर रांजणगाव गणपती जवळ पिंपरी दुमाला रोडवर तेरा मजुरांना घेऊन जाणारा टेम्पोला दुसऱ्या वाहनाची धडक यामध्ये अनेक कामगार जखमी. रांजणगाव मधिल नजीकच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल केले आहे
Mumbai Live : केडीएमसीत लाखोंचा घोटाळा, नसलेले डिव्हायडरही रंगवले; मनसेचा आरोपके डी एम सी ने मुरबाड रोड ते गुरुदेव हॉटेल पर्यंत डिव्हायडर धुणे व रंगवण्याच्या कामाचे बिल ठेकेदाराला दिली आहेत .मनसे कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकिस आणली . मात्र प्रत्यक्षात स्टेशन परिसरात गुरुदेव हॉटेलपर्यंत डिव्हायडर नसताना ही बिल महापालिकेने दिलीच कशी असा सवाल आता मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय.
Pahalgam Terror Attack Live Updates: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं पत्रराज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं पत्र. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याची केली मागणी.
- गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग
- एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांच्या आवर्तनासाठी गंगापूर धरणातून सोडलं पाणी
- गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे ऐन उन्हाळ्यात गोदामाई खळाळली
- नाशिकमध्ये रामकुंड, गोदाघाटाच्या परिसरात पाणी पातळीत वाढ
- गोदा घाटावरील लहान मंदिरांना गोदावरीच्या पाण्याचा वेढा
- पाण्यासोबत जलपर्णी देखील वाहून आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य
- गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Nashik Live: काँग्रेसच्या संविधान सद्भावना मार्चला नाशिकमधून होणार सुरुवात-काँग्रेसच्या संविधान सद्भावना मार्चला आज नाशिकमधून सुरुवात होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता नाशिक शहरातील हुतात्मा स्मारकापासून संविधान सद्भावना मार्च निघणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत सद्भावना मार्च निघेल. या यात्रेतून राज्यात शांती आणि सद्भावनेचा संदेश देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.
Mumbai Live: कुर्ल्यात दोन गटामध्ये तुंबळ हाणामारीकुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी फेज-२ येथे दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी फेज-२ येथे दोन गटांनी एकमेकांवर हल्ला केला, ज्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली. ही घटना विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Nashik Live: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्गनाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने पाणी सोडण्यााच निर्णय घेतला.
Rahul Gandhi Live : राहुल गांधींची पंतप्रधान मोदींना विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्याची विनंतीलोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्याची विनंती केली आहे. "या कठीण काळात, भारताने दाखवून दिले पाहिजे की आपण नेहमीच दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे आहोत," असे पत्रात म्हटले आहे.
Gujarat Live : अहमदाबादमध्ये बेकायदेशीर झोपड्या पाडल्याअहमदाबाद महानगरपालिकेने (एएमसी) चांडोला तलावाजवळील बेकायदेशीर झोपड्या पाडल्या.सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) शरद सिंघल यांच्या मते, बहुतेक बांगलादेशी येथे राहत होते.
Sambhajiraje Chhatrapati : 'पहलगाम घटनेबाबत केंद्राने सखोल चौकशी करावी'; संभाजीराजे यांची मागणीकोल्हापूर : ‘आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात सैन्यदल, पोलिस, सीआरपीएफ जवान यांच्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. मात्र, त्यांनी प्रथमच पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आहे. याची खोलवर चौकशी करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी केली. ते ‘केडीसीए’ आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
Bandra Showroom Fire : वांद्रेतील शोरूमला आग, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखलमुंबईतील वांद्रे येथील एका शोरूममध्ये आग लागली आणि आता संपूर्ण मॉलला आगीने वेढले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कोल्हापूर : टेंबलाई रेल्वे फाटक येथील वर्षासाठी हद्दपार असलेल्या गुंडाला शहरात फिरताना पोलिसांनी अटक केली. रविराज ऊर्फ राजा महेश कसबेकर (वय २७, रा. टेंबलाई रेल्वेफाटक नं. २, झोपडपट्टी जवळ, टाकाळा) असे त्याचे नाव आहे. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली. कसबेकरला करवीर प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे, तरीही तो शहरात फिरताना दिसून आला.
Tirupati Accident : तिरुपतीत भीषण अपघात; बंगळूरचे पाच ठार, दोन जण जखमीबंगळूर : आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात बंगळूरमधील पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. कानिपाकम जवळील थोटापल्लीजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या मोटार चालकाचे नियंत्रण सुटले आणि मागून येणाऱ्या कंटेनर ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिरुपतीहून बंगळूरला परतणाऱ्या मोटारीची ट्रकला धडक झाली. यात मोटार पूर्णपणे चिरडली गेली.
Nagpur News : दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रात दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यूनागपूर जिल्ह्याच्या दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रात एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले. चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या झटापटीत या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 18 ते 20 महिन्याचा हा वाघ आहे.
Pakistan YouTube Channel : पहलगाम दहशतवादी हल्ल्ल्यानंतर पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनेलवर बंदीनवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्ल्यानंतर चुकीची, दिशाभूल करणारी आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील माहिती प्रसारित करत असलेल्या १६ यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ज्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात जिओ न्यूज, डॉन, रफ्तार, बोल न्यूज, एआरवाय न्यूज, समा टीव्ही, सुनो न्यूज यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर या चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे.
Jalna News : जालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा जप्त; तीन संशयित आरोपी जेरबंदजालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. एका चारचाकी वाहनातून 85 किलो गांजा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले. विजय गाडे, अमोल चांदणे आणि बाबासाहेब मुंजवार अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tahawwur Rana : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाच्या कोठडीत वाढनवी दिल्ली : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याचा कोठडीतील मुक्काम बारा दिवसांनी वाढविण्यात आला आहे. अमेरिकेहून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या राणा याच्या कोठडीची मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याला आज पतियाळा हाऊस न्यायालयासमोर सादर केले होते. राणा हा चौकशीत सहकार्य करीत नसल्यामुळे त्याच्या कोठडीत वाढ केली जावी अशी विनंती ‘एनआयए’कडून करण्यात आली होती. न्यायालयाने त्यावर राणा याची कोठडी वाढविली.
Bandra Croma Showroom : वांद्र्यात क्रोमा शोरुमला आग, कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्नवांद्र्यात क्रोमा शोरुमला आग लागल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. सध्या ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Latest Marathi Live Updates 29 April 2025 : पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या दिवशी सीमेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचा भंग केला. शत्रूसैन्याने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा आणि पूँच जिल्ह्यांत गोळीबार केला. या गोळीबाराला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संरक्षणसज्जतेमध्ये आणखी भर घालायला सुरुवात केली आहे. आता नौदलासाठी राफेल-एम ही लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. फ्रान्ससोबत त्यासाठी ६३ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याचा कोठडीतील मुक्काम बारा दिवसांनी वाढविण्यात आला आहे. आज राज्यभरात ठिकठिकाणी शिवजन्मकाळ सोहळ्याचे आयोजन केले आहे. दहशतवादी हल्ल्ल्यानंतर चुकीची, दिशाभूल करणारी आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील माहिती प्रसारित करत असलेल्या १६ यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ज्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..