पाकुल दल, बुर्सर प्रकल्प बांधकाम गती
Marathi April 30, 2025 09:25 AM

सर्कल संस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार अनिश्चित काळासाठी रोखला आहे. याचदरम्यान भारत सिंधू नदीवर दोन स्टोरेज फॅसिलिटी निर्माण करत असून याच्या मदतीने भारताला सिंधू नदीचे पाणी साठविण्यास मदत मिळणार आहे. या सुविधा निर्माण झाल्यावर सिंधू नदीच्या प्रवाहावर नियंत्रण मिळविणे भारतासाठी सोपे ठरणर आहे.

भारताकडून 2 स्टोरेज फॅसिलिटी निर्माण केल्या जात असून याच्याद्वारे सिंधू नदीचे पाणी साठविण्यास मदत होईल. भारत सरकार सिंधू जल करारावर पुन्हा चर्चा करण्यासाठी एक आराखडाही तयार करत आहे. सरकार सिंधू नदी प्रणालीवर दोन नव्या जल साठवणूक प्रकल्प, पाकुलदुल प्रकल्प आणि बुरसर प्रकल्पाच्या कामाला वेग देत आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास भारत स्वत:च्या आवश्यकतेनुसार सिंधू नदीशी जोडलेल्या नद्यांमधून अधिक पाण्याचा साठा करू शकेल आणि याला राजस्थान, पंजाब आणि हरियाणा यासारख्या राज्यांकरता वळवू शकणार आहे.

कराराचा पाकिस्तानला मिळाला लाभ

सिंधू जल करारावर 1960 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अनेक उतारचढाव येऊनही कधी हा करार निलंबित करण्यात आला नव्हता. या कराराच्या अंतर्गत पूर्वेकडील नद्या सतलज, व्यास आणि रावीचे जवळपास 33 दशलक्ष एकर फूट पाणी भारताला कुठल्याही अडथळाशिवाय वापरासाठी देण्यात आले आहे. पश्चिमेकडील नद्या सिंधू, झेलम अणि चिनाबचे जवळपास 135 एमएएफ पाणी बहुतांशकरून पाकिस्तानला देण्यात आले आहे.

पाकिस्तानसमोर संकट

भारत सरकारने करार निलंबित करण्याच्या दोन वर्षांपूर्वीच यावर पुन्हा चर्चा करण्याची तयारी सुरू केली होती. पाकुलदुल प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे.  तर बुरसर प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाकिस्तानची 85 टक्के कृषी अर्थव्यवस्था सिंधू नदी प्रणालीवर निर्भर आहे. परंतु भारत संबंधित प्रकल्प पूर्ण झाल्यावर अधिक प्रमाणात पाणी साठवू शकणार आहे. पाकिस्तान भारताच्या या कृतीमुळे नाराज असून त्याने अनेक प्रकारच्या धमक्याही दिल्या आहेत.

दहशतवाद विरोधात आंतरराष्ट्रीय एकजुटतेचे दर्शन

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजुतट दाखविली आहे, ती दहशतवाद विरोधात झिरो टॉलरन्सचा पुरावा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला हा 26/11 च्या मुब्ंाई हल्ल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. भारत दशकांपासून सीमापार दहशतवादाचा पीडित राहिला आहे. दहशतवादी घटनांचा पीडित, परिवार आणि समाजावर कोणता प्रभाव पडतो हे आम्ही चांगल्याप्रकारे समजू शकतो असे उद्गार संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी काढले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर ज्याप्रकारे जागतिक समुदायाने भारताचे समर्थन केले, त्याचे आम्ही कौतुक करतो असे योजना पटेल यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी कार्यालयात आयोजित ‘व्हिक्टिम ऑफ टेररिजम असोसिएशन नेटवर्क’ कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी वेन्स, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी एकसुरात दहशतवादी हल्ल्याची कठोर निंदा केली आणि भारतासाब्sात एकजुटता दाखविली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.