कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३० ः शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मध्ये इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेमध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय पातळीवर आयोजित या स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागांतील असलेल्या या प्रशालाने ८ वर्षांपासून सलग आणि दर्जेदार यश प्राप्त केले असून, अनेक विद्यार्थी स्कॉलरशिपचे मानकरी ठरले आहेत.
यंदाही प्रशालेतील ११२ विद्यार्थी राऊंड फर्स्टसाठी प्रविष्ट झाले होते. त्यातील ५६ विद्यार्थ्यांची राऊंड सेकंडसाठी निवड झाली होती. या परीक्षेला विविध विषयासाठी देशपातळीवर १ कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होत असतात. यात प्रशालेतील उल्लेखनीय यश प्राप्त केलेले विद्यार्थी असे ः पीयुष मकरंद वायंगणकर (९ वी), चित्रकला विषयात स्टेट टॉपर, शिष्यवृत्ती धारकमध्ये आर्या उमेश सापळे (५ वी), गणित विषयात राज्य गुणवत्ता यादीत २२ वी (एक्सलेन्स अॅवॉर्ड), मुक्ती अमृत भातखांडे (८ वी), चित्रकला विषयात राज्य गुणवत्ता यादीत १३ वी (एक्सेलेन्स ॲवॉर्ड), दक्ष नीलेश पेडणेकर (५ वी), चित्रकला विषयात क्लास टॉपर २, एमिलिया जॅकी देसा (५ वी), गणित विषयात क्लास टॉपर १, लक्ष्मण प्रसाद हर्णे (८ वी), गणित विषयात क्लास टॉपर १, सई स्वप्नील सावंत (६ वी), इंग्रजी विषयात क्लास टॉपर १, सत्यजित संदीप शिरसाट (७ वी), गणित विषयात क्लास टॉपर १, नीतेश प्रशांत चव्हाण (७ वी), गणित विषयात क्लास टॉपर ३, पूर्वा सत्यवान खोचरे (७ वी), गणित विषयात क्लास टॉपर २, प्राची महाबळेश्वर देसाई (९वी), इंग्रजी विषयात क्लास टॉपर १, मुग्धा प्रदिप सावंत (५ वी), चित्रकला विषयात क्लास टॉपर ३, एमिलिया जॅकी देसा (५ वी), चित्रकला विषयात क्लास टॉपर १ यांचा समावेश आहे.