Maharashtra News Live Updates : जालन्यात महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न
Saam TV May 01, 2025 01:45 PM
Jalna: जालन्यात महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

जालन्यात महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालंय.

राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडलाय.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पहलगाम येथील घटनेचा निषेध व्यक्त करत जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच यावेळी मुंडे यांनी परेडच निरीक्षण करून जनतेला महाराष्ट्र दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि जालन्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune News: पुण्यातील 'बीजे' रॅगिंग प्रकरण, अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुखाचा पदभार काढला

'बीजे' मध्ये अस्थिव्यंगोपचार (ऑर्थोपेडिक) विभागात प्रथम वर्षाला शिकणाऱ्या निवासी विद्यार्थी डॉक्टरने रॅगिंग झाल्याची तक्रार प्रथम या विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांच्याकडे केली होती

त्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवले

यावरून डॉ. बारटक्के यांचा विभाग प्रमुखाचा पदभार काढण्यात आला आहे

तसेच रॅगिंग करणाऱ्या तीन निवासी डॉक्टरांचे सहा महिन्यासाठी शिक्षण सत्रातून व वसतिगृहातून निलंबन

Pune News: पुण्यातील बहुप्रतीक्षत अशा सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा

उपमुख्यमंत्री अजित पवार आज करणार उड्डाणपूलाच उद्घाटन

विठ्ठलवाडी ते फन टाईम थेटर पर्यंत जवळपास 2100 मीटरच्या उड्डाणपुलाचा आज होणार लोकार्पण सोहळा

उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूक कोंडी टळणार

सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतून पुणेकरांची होणार सुटका

अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील देखील राहणार उपस्थित

Maharashtra Din 2025: नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्राच्या ६५ वा दिवस साजरा करण्यात आला

1 मे महाराष्ट्र आणि कामगार दिवसानिमिताणे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,

मुख्य सोहळा जिल्हा पोलिस दलाच्या मैदानावर संपन्न झाला राज्यचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,

पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करत मानवंदना देण्यात आली, जिल्ह्यातील अनेक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस महासंचालक पदक देऊन सत्कार करण्यात आला,

तर राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला असून या नुकसानाची भरपाई तातडीने दिली जाणार आहे

त्यासोबतच जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या असल्याने यावर उपाययोजना देखील लवकरच होणार असल्याची गवई पालकमंत्र्यांनी दिली,

Nandurbar: येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने लांगड ओढण्याचा कार्यक्रम पार पडला उत्साहात

नंदुरबार तालुक्यातील उमदें खुर्द गावातील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त हजारो नागरिकांच्या साक्षीने 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने लांगड ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यंदा यात्रा भरविण्याचा ग्रामस्थांतर्फे निर्णय घेण्यात आला होता अक्षयतृतीयेच्या रात्री श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरली.

पाचव्या पिढीतील श्री खंडेराव महाराजांचे सेवेकरी जितेंद्र मराठे बारागाड्या ओढत होते.

पाच वर्षांपासून जितेंद्र मराठे हेच यात्रेत बारा गाड्या ओढत होते, मात्र मागील वर्षापासून त्यांचे लहान बंधू महेंद्र मराठे यांनी बारागाड्या ओढल्या.

सुरवातीला तगतराव, नंतर बारागाड्यांची रचना केली जाते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नंदुरबारसह परिसरातील गावांतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती...

Vitthal Rukmini Temple: महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आज पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

सजावटीमुळे मुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत आहे.

सजावटीसाठी ब्लू डीजी 1500 गड्डी, स्टेटस 1500 गड्डी, कामिनी 1500 गड्डी, जिप्सो 100 गड्डी, ऑर्किड 5 गड्डी, जरवेरा 20 गड्डी, दस गुलाब 20 गड्डी, झेंडू भगवा 300 किलो, झेंडू पिवळा 300 किलो इत्यादी दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे.

ही सजावट पुणे विठ्ठल भक्त चव्हाण परिवाराच्यावतीने केली आहे.

अकोल्यात पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोपाची बैठक

जलसंपदा विभागातर्फे जल व्यवस्थापन कृती पंधरवडा राबविण्यात आलाय..

या पंधरवड्याचा समारोपीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालाय..

इस्त्रायल तसेच काही आखाती देशांमध्ये कमी पावसातही उत्कृष्ट नियोजनातून समृध्दी निर्माण करण्यात आलीये..

त्या तुलनेत आपल्याकडे पाण्याची मोठी उपलब्धता आहे.... आणि त्याचा उचित वापर झाला पाहिजे...

तर हजारो वर्षांच्या पावसाने जमिनीत निर्माण झालेल्या पाण्याच्या साठ्याचा उपसा हानीकारक ठरू शकते, त्यामुळे पाण्याचा उचित वापर ही सवय लावावी, आणि कालव्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पाणी शेवटच्या बिंदुपर्यंत पाणी पोहोचत नाही...

त्यामुळे नेहमी स्वच्छता असली पाहिजे असेही पालकमंत्री आकाश फुंडकर म्हटले..

तसेच पाणी जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषी व जलसंपदा विभागाने समन्वयाने करावी, असे आदेशही पालकमंत्री फुंडकर यांनी दिले आहे....

कारने दुचाकीस्वार तरुणीला चिरडले,थरार सीसीटिव्हि कँमेरात कैद

राजगुरुनगर पाबळ रोडवर होलेवाडी येथे भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या कारने समोरुन येणाऱ्या दुचाकीला चिरडले असुन या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यु झाला हा अपघाताचा थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला

अपघातानंतर कार चालक फरार झाला मात्र नातेवाईकांनी सीसीटिव्हि कँमेराच्या माध्यमातून कार चालकाला शोधले याप्रकरणी राजगुरुनगर पोलीसांत कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

Akola: अकोल्याचा पारा 45 अंशांवर, तर जलसाठ्यात दीड टक्क्यांनी घट

गेल्या आठवडाभरापासून मागील आठवड्यापासून अकोला जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे.

काल तापमानाच्या पाऱ्याने 45 अंश सेल्सियसची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यातील जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊ लागली आहे..

अकोल्याच्या जलसाठ्यात आठवडाभरात दीड ते दोन टक्क्यांनी घट झाली आहे.

30 एप्रिलअखेर अकोला जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी 24 टक्क्यांवर आली आहे.

जलसाठ्यातील होणारी संभाव्य घट लक्षात घेता, पुढील दीड महिना पाण्याच्या बाबतीत कसोटी पाहणारा असणार आहे.

त्यामुळे आता पोलीस शहरांना तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता सहा दिवसात करण्याचे नियोजन असणार आहे..

तसेच पाणी जपून वापरण्याचा आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले..

Dharashiv: धाराशिव येथील जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रमात पॉलिटिकल वॉर

जलव्यवस्थापनाच्या कार्यक्रमात राजकीय वातावरण तापले

पाणी प्रश्नावरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची एकमेकावर बोचरी टीका

निवडणुकीच्या तोंडावर फक्त पाणी येणार सांगितलं जात, दोन पिढ्यांपासून हेच सुरू;ओमराजे निंबाळकर यांची आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता हल्ला

तर पाणी येण्यात काही झारीतील शुक्राचार्य यांनी अडथळे आणले राणाजगजितसिंह पाटील यांची ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम,लोकप्रतिनिधींनी

कार्यक्रमात एकमेकांच नावही घेतलं नाही

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शिवप्रतिष्ठांच्यावतीने मावळ तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

काश्मीर येथील पहेलगाव हल्ल्यात दहशतवाद्यांनी सत्तावीस निरपराध पर्यटकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याची पडसाद देशभर उमटले.

मावळच्या वडगाव मधील तहसील कार्यालयावर शिवप्रतिष्ठांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा तरुणांचा मोठा सहभाग दिसून आलाय.

आम्ही पाकिस्तान मुर्दाबाद म्हणणार नाही. कारण की अखंड हिंदुस्तान चा तो एक भाग आहे. आणि हिंदुस्तान आमची आई आहे.

आईला मुर्दाबाद कसं म्हणायचं असा सवाल शिवप्रतिष्ठांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

पाकिस्तानावर हल्ला करून पाकिस्तान अखंड हिंदुस्तान सामील करा जेणेकरून दहशतवादी राहणार नाही आणि आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने कोणीही बघणार नाही...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.