डासांची समस्या कायमची संपवायची आहे? हे घरगुती उपाय वापरा!
GH News May 01, 2025 05:08 PM

ऋतू कोणताही असो, डासांचा त्रास कायम असतो! घरात डास शिरले की रात्रीची झोप उडते, लहान मुलं त्रस्त होतात आणि मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा धोका वाढतो. बाजारात मिळणाऱ्या मॉस्किटो कॉईल्स, स्प्रे किंवा लिक्विड्स काही काळासाठी डास दूर करतात, पण त्यातील केमिकल्समुळे श्वासोच्छ्वासाच्या तक्रारी किंवा अ‍ॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे रसायनांपासून दूर राहून, नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय वापरणं केव्हाही चांगलं. चला तर मग, काही सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांद्वारे डासांना घराच्या बाहेर कसं ठेवायचं, ते जाणून घेऊया!

1. लेमनग्रास तेलाचा वापर करा : लेमनग्रास हे डासांसाठी एक नैसर्गिक रिपेलेंट आहे. याचा सुगंध डासांना सहन होत नाही. तुम्ही हे तेल डिफ्यूझरमध्ये टाकून खोलीत वापरू शकता किंवा कापसावर हे तेल टाकून खोलीच्या कोपऱ्यात ठेवू शकता. त्यामुळे डास खोलीत शिरत नाहीत.

2. पुदिना आणि तुळशीची झाडं लावा : पुदिना आणि तुळस या दोन्ही झाडांचा सुगंध डासांना सहन होत नाही. घरात ही झाडं लावल्यास वातावरण शुद्ध राहतं आणि डास घराच्या आसपास फिरकत नाहीत.

3. साचलेलं पाणी लगेच साफ करा : डास प्रजननासाठी साचलेल्या पाण्याचा वापर करतात. त्यामुळे कुलर, पॉट्स, टाक्या, कुंड्यांच्या तळाशी साचलेलं पाणी न साचू देता ते नियमितपणे स्वच्छ करा. ही सवय डासांची वाढ थांबवते.

4. कापूर जाळा : कापूर जाळल्यावर त्याचा धूर घरात पसरतो आणि हा वास डासांना आवडत नाही. एका खोलीत काही वेळ दरवाजा बंद करून कापूर जाळल्यास डास लगेच पळून जातात. हा उपाय विशेषतः झोपण्याच्या आधी केल्यास फायदा होतो.

5. कडुलिंबाचा धूर किंवा तेल वापरा : कडुलिंबाची पाने जाळून त्याचा धूर घरात पसरवल्यास डास दूर राहतात. किंवा कडुलिंबाचं तेल नारळाच्या तेलात मिसळून अंगाला लावल्यास ते नैसर्गिक मॉस्किटो रिपेलेंटसारखं काम करतं.

6. लसूण स्प्रे तयार करा : लसणाच्या पाकळ्या थोड्या पाण्यात उकळा आणि ते पाणी गाळून घरात स्प्रे करा. लसणाचा तीव्र वास डासांना सहन होत नाही, त्यामुळे ते लगेच पळून जातात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.