आयपीएल 2025 मधील 50 व्या सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्यात होम टीम राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा दोन्ही संघांचा या मोसमातील 11 वा सामना आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 3 मिनिटांनी टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार रियान पराग याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल आणि फजलहक फारुकी.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.