युपीआयचे व्यवहार होणार आणखी सुपरफास्ट! १५ सेकंदात होईल पूर्ण काम, जाणून घ्या प्रक्रिया
ET Marathi May 02, 2025 04:45 PM
Upi Payment : आजकाल रोखीने व्यवहार कमी झाले असून युपीआयच्या माध्यमातून किरकोळ व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या व्यवहारांना आणखी गतीशील करण्यासाठी एनपीसीआयचे प्रयत्न सुरू असतात. १६ जून २०२५ पासून तुमचा युपीआय व्यवहार (डेबिट-क्रेडिट) फक्त १५ सेकंदात पूर्ण होईल. सध्या याला ३० सेकंद लागतात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI ऑपरेशन्समध्ये API प्रतिसाद वेळ कमी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिसाद वेळ म्हणजे व्यवहार सुरू झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत लागणारा वेळ होय. याशिवाय, व्यवहाराची स्थिती तपासणे किंवा पैसे काढणे देखील ७५% ने जलद होईल. या नवीन नियमामुळे तुम्हाला काय फायदा होईल. त्याबाबत जाणून घेऊ...ET ने दिलेल्या माहितीनुसार, समजा तुम्ही एका दुकानात गेलात आणि ५०० रुपयांचा माल खरेदी केला. तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या आयमोबाइल अॅपवरून क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट केले. जर तो QR कोड HDFC बँक खात्याशी लिंक असेल, तर आयसीआयसीआय बँक एक पेमेंट रिक्वेस्ट जनरेट करेल, जी NPCI नेटवर्कद्वारे HDFC बँकेकडे जाईल. पेमेंट झाले आहे की नाही हे तपासल्यानंतर एचडीएफसी बँक प्रतिसाद पाठवेल. हे पुन्हा एनपीसीआय नेटवर्ककडून आयसीआयसीआय बँकेकडे येईल. पूर्वी याला ३० सेकंद लागत होते. पण १६ जूनपासून संपूर्ण प्रक्रियेला फक्त १५ सेकंद लागतील. ही प्रणाली कशी काम करेल?तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे केवळ व्यवहाराचा वेळ कमी होणार नाही तर स्थिती तपासण्यातही मोठा फरक पडेल. नवीन नियमांनुसार, व्यवहार सुरू झाल्यानंतर किंवा पडताळणी झाल्यानंतर पीएसपी बँक/अधिग्रहण करणारी बँक पहिल्यांदाच ९० सेकंदांनी स्थिती तपासू शकते. आता ही वेळ ४५ वरून ६० सेकंदांपर्यंत वाढली आहे. एप्रिलमध्ये UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या वर्षानुवर्षे ३४% वाढून १७.८९ अब्ज झाली. तसेच, मार्चच्या तुलनेत यामध्ये थोडीशी घट झाली आहे. गेल्या महिन्यात हा आकडा १८.३० अब्ज रुपये होता.व्यवहारांच्या संख्येसोबतच एप्रिलमध्ये UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्येही वाढ झाली आणि ती वर्षानुवर्षे २२ टक्क्यांनी वाढून २३.९५ लाख कोटी रुपये झाली. मार्चमध्ये UPI व्यवहारांचे एकूण मूल्य २४.७७ लाख कोटी रुपये होते. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये UPI व्यवहारांची संख्या आणि मूल्यात घट झाली आहे कारण महिन्यातील दिवसांच्या संख्येत फरक आहे. मार्चमध्ये ३१ दिवस होते, तर एप्रिलमध्ये ३० दिवस होते.