बांग्लादेश अजून सुधरत नाहीय. सातत्याने भारतविरोधी भूमिका घेतोय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही बांग्लादेशच तेच चाललय. सातत्याने भारताविरोधात वक्तव्य आणि खोटे आरोप बांग्लादेशकडून सुरु आहेत. प्रत्येकवेळी बांग्लादेश भारताला अडचणीत आणण्याची कुठली संधी सोडत नाही. मात्र, तरीही भारत बांग्लादेशच्या बाबतीत सतत आपल्या उदारतेचा परिचय देतोय. यावेळी सुद्धा भारताने नापाक इरादे बाळगून असलेल्या यूनुस सरकारवर दया दाखवली आहे. त्यांची दोन माणसं त्यांना परत सोपवली. बीएसएफने भारतीय क्षेत्रात ‘टिक टॉक व्हिडिओ’ बनवताना पकडलेल्या दोन बांग्लादेशींना परत त्यांच्याकडे सोपवलय. भारतीय सीमा सुरक्षा बल BSF ने आज सकाळी दोन बांग्लादेशी युवकांना परत केलं. त्यांना लालमोनिरहट पटग्राम सीमेवरुन ताब्यात घेण्यात आलं होतं.
61 बीजीबी बटालियन धबलसुती बीओपी कॅम्पचे कमांडर नायक सूबेदार मोक्तर हुसैन यांनी मीडियाला सांगितलं की, बॉर्डर गार्ड बांग्लादेश (बीजीबी) आणि बीएसएफ दरम्यान सकाळी 3.30 वाजता फ्लॅग मीटिंग दरम्यान दोन बांग्लादेशींना परत करण्यात आलं. या युवकांना त्यांच्या कुटुंबांकडे सोपवण्यात आलं आहे.
टिक टॉक व्हिडिओ बनवत होते
BSF ने सांगितलं की, दोन्ही युवक बेकायदरित्या भारतात घुसले होते. चहाच्या मळ्यात टिक टॉक व्हिडिओ बनवत होते. एका युवकाच नाव साजेदुल इस्लाम (22) आणि दुसरा 16 वर्षांचा आहे. दोघे संध्याकाळी 6:00 वाजता गटियारविटा सीमेवरील नो-मॅन्स-लँड क्षेत्रातील सब पिलर 1-एस येथून भारतीय चहाच्या मळ्यांमध्ये घुसले होते. ते मोबाइलवर टिक टॉक व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. त्याचवेळी BSF च्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतलं.
फ्लॅग मीटिंगनंतर सोपवलं
सैन्याने ताब्यात घेताच दोन्ही युवकांना रडू कोसळलं. आपली सुटका करावी अशी त्यांनी मागणी केली. बीजीबी रंगपुर सेक्टर कमांडर आणि बीएसएफ जलपाईगुडी सेक्टर कमांडरमध्ये संपर्क झाला. बीएसएफने फ्लॅग मीटिंगनंतर दोन्ही युवकांना पुन्हा बांग्लादेशकडे सोपवलं.