Koyta Terror Returns to Pune: पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याचा थरार पाहायला मिळालाय. बिबेवाडीत भर रस्त्यावर कोयत्याने झालेल्या तुफानी हाणामारीनं नागरिकांची झोप उडवली. १७ एप्रिल रोजीच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही फुटेजमधून समोर (CCTV Video Goes Viral) आला आहे. याप्रकरणी बिबेवाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार, सतीश पवार यांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी अटक करून आरोपींना न्यायालयात हजर केलं. कोर्टाने भिसे व पवार या सगळ्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
अटक केलेल्या आरोपींना तात्काळ न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता त्यांना जामीन दिल्यास ते पुरावे नष्ट करू शकतात किंवा पुन्हा गुन्हा करु शकतात. या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. घटनेमागचं नेमकं कारण काय होतं, हे शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. तसेच आरोपींच्या मोबाईल तपासणीद्वारे कोणत्या टोळीशी त्यांचा संबंध आहे का, हे शोधलं जात आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. याचसोबत पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या गुन्हेगारी हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन केलं आहे.