घोरपडी, ता. २ : जहांगीरनगर येथील सम्राट अशोक फाउंडेशनच्या वतीने महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. या वेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात विधवा महिलांना साड्या वाटप व लहान मुलांना शालेय साहित्य देण्यात आले.
या वेळी रमेश राक्षे, प्रशांत फुले, पल्लवी हर्ष, मनोहर यादव, सुनील वाघमारे, मिलिंद सरोदे, वाजित खान, प्रयागा होगे यांना पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन बगाडे, पाटबंधारे विभागाचे माजी कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, स्वामी हिमांशू, संतोष कडाळे, किशोर कांबळे, स्वप्नील गायकवाड, दीपाली चव्हाण, श्रीकांत कसबे, कैलास चक्रे, मयूर उपाडे, राजश्री म्हस्के आदी या वेळी उपस्थित होते.
सम्राट अशोक फाउंडेशनचे संस्थापक कुमार चक्रे व अध्यक्ष श्रीधर जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.