How To Relieve Joint Pain Naturally: ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’ची स्थापना पुण्यात ३६ वर्षांपूर्वी झाली. तीच मुळात सांधेदुखीवर रामबाण, कायमचा उपचार करण्यासाठी. सांधेदुखी आणि संबंधित आजारांतून रुग्णांना वेदनामुक्त करण्यासाठी. ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’ने त्यासाठी अनोखी उपचारपद्धती तयार केली आहे. या उपचार पद्धतीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच नागपूर आणि सुरत येथेही ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’च्या शाखा सुरू झाल्या.
‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’मध्ये सर्व प्रकारच्या लिगामेंट इंज्युरी, फ्रोजनशोल्डर, स्नायूंमधील लचक-चमक, सूज, स्नायूंना रंग लागणे, मानेचे, मणक्याचे व कमरेचे आजार तसेच खुब्याचे आजार (हिप जॉइंट नेक्रोसीस) लंबर स्पाँडिलायटिस, ऑस्टिओ आर्थ्रोयटिस, रुमेटॉइड आर्थ्रोयटिस (आमवात), रुमेटिक आर्थ्रोयटिस (उष्णवात), अँकिलोझिंग स्पाँडिलायटिस आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी यावर येथे उपचार केले जातात. सांधेदुखीशी संबंधित आजारांबरोबरच लिगामेंट इंजुरी, कार्टिलेज लॉस, डिस्क बल्ज यावरही उपचार येथे केले जातात. तेही कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय.
उपचार सुरू करण्यापूर्वी विविध तपासण्यांद्वारे योग्य ते निदान केले जाते. पारंपरिक औषधी वनस्पतींपासून ही औषधे तयार केली जात असल्यामुळे कोणत्याही औषधांचा दुष्परिणाम शरीरावर होत नाही. त्यामुळेच हृदयरोग, मधुमेह किंवा अन्य कोणताही रोग असलेले रुग्णही ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’मध्ये अगदी सहजपणे उपचार घेऊ शकतात.
हे उपचार घेण्यासाठी कुठेही अॅडमिट होण्याची गरज नाही किंवा एकदाच सगळे पैसेही भरावे लागत नाहीत. महिन्यातून एकदा क्लिनिकमध्ये येऊन ओपीडीप्रमाणे घरच्याघरी उपचार घेता येतात. ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’ रविवारीही सुरू असते.