हिंजवडी, ता. ३ : दर्जेदार फूड क्वालिटी, तत्पर सेवा, प्रसन्न वातावरण, मनमोहक स्वच्छता, आपुलकीने आदरातिथ्य याआधारे खाद्य संस्कृतीचे सर्व मापदंड ओलांडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जगप्रसिद्ध आयटी पार्कमधील नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या हॉटेल बर्ड व्हॅलीच्या हिंजवडीतील एक्स्प्रेस पुअर व्हेज या सहाव्या शाखेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर, माजी नगरसेवक राहुल कलाटे, प्रकाश बाबर, शारदा बाबर, योगेश बाबर, भीमराव मोरे, उद्योजक अमित बाबर, हरिदास मोरे, सुमित बाबर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी होती.
बारणे म्हणाले, ‘‘रुचकर जेवण आणि दर्जेदार सेवेच्या जोरावर बर्ड व्हॅली ग्रुपने ग्राहकांच्या मनात जागा केली आहे. पुणेकरांच्या या हक्काच्या देश-विदेशात शेकडो शाखा होतील यात शंका नाही.’’
बर्ड व्हॅली ग्रुपच्या पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह आयटी पार्क हिंजवडीत देखील अनेक शाखा आहेत. मात्र, बर्ड व्हॅली एक्सप्रेस व्हेज या पहिल्या प्रशस्त आणि भव्य शाखेचा हिंजवडीचे प्रवेशद्वार आणि नाक असलेल्या छत्रपती शिवाजी चौकात प्रारंभ झाल्याने ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ते सज्ज झाले आहे. या ठिकाणी प्रशस्त रूम्ससह मल्टिनॅशनल लेव्हलच्या अनेक सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.