आयपीएल 2025 च्या 52 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आले आहेत. या सामन्यात आरसीबी प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. तर चेन्नई सुपर किंग्स त्यांची प्रतिष्ठा आणि पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरेल. असं असताना चाहत्यांचे लक्ष विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीवर असेल. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आम्हाला मिळालेल्या शेवटच्या काही सामन्यांचा आम्हाला जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. पुढच्या वर्षी कोणता खेळाडू कोणत्या भूमिकेत बसेल हे पाहण्याचा प्रयत्न करू. आम्हाला सामने जिंकायचे आहेत पण चारही सामन्यांपैकी जास्तीत जास्त फायदा मिळवणे महत्त्वाचे आहे. ते अवघड वाटते, बऱ्याच काळापासून अंडर कव्हरवर खेळले असावे आणि त्याशिवाय ते असे ठिकाण आहे जिथे धावा करणे सोपे आहे. ते एक उच्च-स्कोअरिंग ठिकाण आहे आणि सुरुवातीनंतर फलंदाजी करणे चांगले असेल.’
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार म्हणाला की, ‘आम्हीही क्षेत्ररक्षण केले असते. पण विकेटमध्ये फारसा बदल होणार नाही. आम्ही चांगली धावसंख्या उभारण्याचा आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू. प्रत्येकजण चांगल्या मानसिकतेत आहे आणि आपापल्या भूमिका बजावत आहे, कर्णधार म्हणून मला माझ्या मुलांवर खूप विश्वास आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी संघासाठी कामगिरी केली आहे आणि हे एक चांगले लक्षण आहे. आमच्याकडे 4 सामने आहेत आणि आम्ही सर्व सामन्यांमध्ये आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.’
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, यश दयाल.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, दीपक हुडा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, मथीशा पाथिराना