जर तुम्ही इलेक्ट्रीक बाईक विकत घेण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण देशातील पहिली गिअरवाली इलेक्ट्रीक बाईक फ्लिपकार्टवर देखील लाँच झाली आहे. या इलेक्ट्रीक बाईकला ४० हजार रुपयांच्या घसघशीत डिस्काऊंटवर खरेदी करता येऊ शकणार आहे. एरा मॅटर कंपनीने अधिकृतरित्या त्यांची गिअरवाली इलेक्ट्रीक बाईक एरा हिला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर १,८३,३०८ ( एक्स -शोरुम ) सुरुवातीची किंमतीवर लाँच केली आहे.
मॅटर ऐरा कंपनीने इलेक्ट्रीक मोटरबाईकवर मोठी ऑफर दिली आहे. याची किंमत ₹39,827 रुपये आहे.या ही विशेष लॉन्च प्राईस, फ्लिपकार्टवरुन प्लॅटफ़ॉर्म-स्पेशल सूट आणि मर्यादित काळासाठी क्रेडिट कार्ड ऑफर देखील यात सामील आहे. इलेक्ट्रीक मोटरबाईक मॅटर ऐराचे टॉप मॉडची किंमत 5000+ ₹1,93,826 ( एक्स-शोरूम )ने सुरु होत आहे.
मॅटरने दिलेल्या माहीतीनुसार ही देशातील एडव्हान्स इलेक्ट्रिक टू-व्हीलर वाहनांची खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रीक मोबिलीटीला वेग आणण्यासाठी एक मोठा प्रयत्नाचा एक भाग आहे.
मॅटर एराने इलेक्ट्रीक मोटरसायकल सेगमेंटने एक मॅन्युअल गिअरबॉक्स सादर केला आहे. यात 4-स्पीड ट्रान्समिशनसह तीन रायडिंग मोड आहेत, इको, सिटी आणि स्पोर्ट्स सामिल आहे. एरामध्ये 5 kWh, IP67-रेटेड बॅटरी देखील आहे,जी एकादा चार्ज केल्यावर 172 किलोमीटर (दावा) पर्यंत रेंज देते. बाईक 2.8 सेकंदाहून कमी वेळात 0 ते 40 किमी प्रति तासाचा वेग धारण करु शकते.
मॅटर एरामध्ये नेव्हीगेशन, मीडिया, कॉल आणि ओव्हर-द-एअर अपडेटसाठी सपोर्टसह 7 – इंचाचा टचस्क्रीन डॅशबोर्ड देण्यात आला आहे. बाईकमध्ये होम चार्जिंगसाठी 5-एम्प सॉकेट सह एक ऑनबोर्ड चार्जर देखील सामील आहे. रायडर एका मोबाइल ऐपद्वारे याच्याशी कनेक्ट करु शकतो.यात डाटा एक्सेस, रिमोट लॉकिंग, जिओ-फेंन्सिंग आणि देखभालीकरता अलर्ट सुद्धा मिळतो.