महाराष्ट्र राज्य मंडळाचा इयत्ता 12वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. काही विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले असतील, तर काहीजण अपेक्षेपेक्षा कमी मार्क्समुळे नाराजही असतील. अशा वेळी मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
निकालानंतरचा मानसिक ताण दूर करण्यासाठी पालकांनी मुलांसोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. एक छोटा ट्रिप प्लॅन केल्यास त्यांचा मूड फ्रेश होतो आणि पुन्हा नव्या जोमाने पुढील अभ्यास किंवा आयुष्याला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते.
हे ठिकाण शांत, निसर्गरम्य आणि गर्दीपासून दूर आहे. हिरव्यागार टेकड्या आणि आल्हाददायक हवामान मुलांना मानसिक शांतता देतात. येथील वातावरणात मोबाईलपासून दूर राहत नैसर्गिक अनुभव घेता येतो.
7800 फूट उंचीवरील हे ठिकाण हिमालयातील पंचचुली पर्वतशिखरांचे दर्शन देतं. मुलांना येथे स्थानिक संस्कृती, प्राचीन मंदिरे, धबधबे आणि सुर्यास्ताचे सुंदर दृश्य अनुभवता येते.
कसौली हे कमी उंचीवर वसलेले, त्यामुळे प्रवास अधिक सोपा. येथील थंड हवामान, हिरवीगार झाडं आणि स्वच्छ हवा मुलांच्या मनाला प्रफुल्लित करते. कुटुंबासोबत शांतीत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण.
प्राकृतिक सौंदर्याने भरलेले रानीखेत हे ठिकाण थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. येथे फिरताना मुलांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव येतो. लष्करी इतिहास व पारंपरिक बाजारपेठाही बघता येते.
नैनी सरोवरात बोटिंगचा आनंद, रोपवेने टेकड्यांवरून दृश्य पाहण्याचा अनुभव आणि शॉपिंगसाठी प्रसिद्ध माल रोड – हे सर्व नैनीतालमध्ये मिळते. मुलांसाठी ही सहल शिक्षण आणि विरंगुळा दोन्ही देते.
‘क्वीन ऑफ हिल्स’ म्हणून प्रसिद्ध मसूरीमध्ये केम्प्टी फॉल्स, गन हिल पॉइंट आणि निसर्गरम्य ट्रेकिंग ट्रेल्स आहेत. मुलांना साहस, निसर्ग आणि आनंद मिळवण्यासाठी हे उत्तम डेस्टिनेशन आहे.