62012
62013
62014
मराठे विद्यालयाचा
शंभर टक्के निकाल
फोंडाघाट, ता. ६ ः ब्रम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित (कै.) राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. हा निकाल सलग पंधराव्या वर्षी शंभर टक्के लागला.
या परीक्षेसाठी एकूण ६६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी २९ विद्यार्थी प्रथम श्रेणीमधून, ३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमधून उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रशालेतून अनुक्रमे ऋतुजा महेश पडवळ (४३० गुण) ७१.६७ टक्के, जानवी संजय पवार (४२५ गुण) ७०.८३ टक्के आणि हर्षदा जयेंद्र जळवी (४१६ गुण) ६९.३३ टक्के मिळवत उत्तीर्ण झाले. येथील (कै.) नामदेवराव मराठे यांनी २००९ मध्ये स्थापन केलेल्या या विद्यालयाचा निकाल सातत्याने शंभर टक्के लागत असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन उत्तीर्ण होत आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थाध्यक्ष दिपेश नामदेव मराठे, सर्व संस्था पदाधिकारी तसेच प्राचार्य जयराज राऊळ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मुलांचे अभिनंदन केले.