पिंपरी - यंदा उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये ‘सकाळ माध्यम समूह’ पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडकरांसाठी उत्तमोत्तम नाटकांची मेजवानी घेऊन येत आहे. या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते व निर्माते भरत जाधव यांच्या उत्तमोत्तम कलाकृतींचा आस्वाद नाट्य रसिकांना घेता येणार आहेत.
म्हणूच हा महोत्सव ‘भरत जाधव विशेष नाट्य महोत्सव’ असणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात १९ ते २१ मेदरम्यान हा नाट्य महोत्सव पार पडणार असून; रात्री ९ वाजता नाटकाच्या प्रयोगाला प्रारंभ होईल.
भरत जाधव यांना नाटक, चित्रपट क्षेत्रातील ‘हास्यसम्राट’ म्हणून ओळखले जाते. गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून आपल्या अभिनयाने त्यांनी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांची गाजलेली विनोदी नाटके सलग तीन दिवस अनुभवण्याची संधी पिंपरी चिंचवडमधील नाट्यरसिकांना मिळणार आहे.
भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित ‘पुन्हा सही रे सही’ या लोकप्रिय नाटकाच्या प्रयोगाने १९ मे रोजी नाट्य महोत्सवाला प्रारंभ होईल. या नाटकात भरत जाधव हे चौरंगी भूमिका साकारत आहेत. यानंतर २० मे रोजी आचार्य अत्रे लिखित ‘मोरूची मावशी’ हे नाटक होईल.
महोत्सवाचा समारोप २१ मे रोजी ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकाने होईल. या संपूर्ण महोत्सवाचे तिकीट घेतल्यास रसिकांना विशेष सवलत मिळणार आहे. फरांदे स्पेसेस हे नाट्य महोत्सवाचे सहप्रायोजक आहेत.
कुठे? केव्हा? कधी?
कुठे : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह
केव्हा : १९ ते २१ मे
कधी : रात्री ९ वाजता
नाट्य महोत्सवातील प्रयोग
सोमवार (ता. १९ मे) - ‘पुन्हा सही रे सही’
मंगळवार (ता. २० मे) - ‘मोरूची मावशी’
बुधवार (ता.२१ मे) - ‘श्रीमंत दामोदर पंत’
तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती)
संपूर्ण महोत्सवाचे तिकीट (तळमजला) - १,२००
प्रति नाटक तिकीट (तळमजला) - ५००
प्रति नाटक तिकीट (बाल्कनी) - ४००
अधिक माहितीसाठी संपर्क : ७७०९०९७१११