सरकारी नोकरी आणि लाखो रुपयांचा पगार हवाय? मग त्वरीत अर्ज करा, मोठी नोकरी मिळवा
Marathi May 07, 2025 11:25 PM

बीआयएस भरती 2025: सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही अभियांत्रिकी किंवा रसायनशास्त्रात पदवी घेऊन सरकारी नोकरी शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी म्हत्वाची आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने शास्त्रज्ञ-‘ब’ पदासाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया 3 मे 2025 पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार 23 मे 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइट bis.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार येथे दिलेल्या चरणांद्वारे देखील अर्ज करू शकतात.

किती पदे रिक्त आहेत?

रसायनशास्त्र: 2 पदे
सिव्हिल इंजिनिअरिंग: 8 पदे
संगणक अभियांत्रिकी: 4 पदे
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: 2 पदे
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग: 2 पदे
पर्यावरण अभियांत्रिकी: 2 पदे

आवश्यक पात्रता काय?

अभियांत्रिकीशी संबंधित पदांसाठी, अर्जदाराकडे अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात 60 टक्के गुणांसह बॅचलर पदवी आणि 2023 2024 किंवा 2025 मध्ये वैध GATE स्कोअर असणे आवश्यक आहे. तर, रसायनशास्त्रासाठी, उमेदवारांकडे नैसर्गिक विज्ञान (रसायनशास्त्र) मध्ये पदव्युत्तर पदवी आणि वैध GATE स्कोअर असणे आवश्यक आहे. एससी/एसटी प्रवर्गासाठी किमान गुणांमध्ये सूट आहे.

निवड झाल्यास उमेदवारांना किती पगार मिळणार?

बीआयएसमध्ये निवड झालेल्या शास्त्रज्ञ-बी ला दरमहा सुमारे 1 लाख 14 हजार 945 रुपये पगार मिळेल. याशिवाय त्यांना इतर भत्तेही मिळतील. त्यामुळं या पदांसाठी जे पात्र उमेदवार आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. कारण सरकारी नोकरीही आहे आणि चांगली पगारही मिळणार आहे.

कसा कराल अर्ज ?

उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट bis.gov.in ला भेट द्यावी.
त्यानंतर उमेदवारांनी “करिअर संधी” विभागावर क्लिक करावे.
यानंतर, उमेदवारांनी “ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा” ही लिंक उघडावी.
त्यानंतर उमेदवार नवीन खाते तयार करतात, आवश्यक माहिती भरतात आणि लॉगिन करतात.
त्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरावा आणि तो सबमिट करावा.
त्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रिंटआउट घ्यावी.

दरम्यान, सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे. त्यामुळं जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी त्वरीत या पदांसाठी अर्ज करावा. अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 23 मे देण्यात आलेली आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांना अधिकची माहिती हवी आहे, त्यांनी bis.gov.in या बेवसाईटवर सविस्तर माहिती पाहावी.

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त 3 दिवस

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.