पाकिस्तानात आता लाहोरनंतर कराचीमध्ये बॉम्ब स्फोट झाल्याच वृत्त आहे. कराची पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते. इथे ड्रोनव्दारे ब्लास्ट झाला आहे. कराचीमधल्या स्फोटाने संपूर्ण पाकिस्तानात घबराट पसरली आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, कराचीमध्ये ड्रोन ब्लास्ट झालाय. ड्रोन ब्लास्टनंतर संपूर्ण भागात घबराट पसरलीय. सैन्याने संपूर्ण भाग आपल्या ताब्यात घेतला आहे. कराचीमध्येच पाकिस्तानच अणवस्त्र बॉम्ब स्टोर आहे. कराचीमधल्या ड्रोन ब्लास्टमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कराचीमधला स्फोट हा तिथल्या सुरक्षा व्यवस्थेतील मोठी कमतरता दाखवून देतोय.
पाकिस्तानच्या कराची, गुंजरावाला, लाहोर, चकवाल आणि घोटकी येथे ड्रोन अटॅक झालाय. ड्रोन अटॅकमुळे या भागात इमर्जन्सी सारखी स्थिती आहे. हे ड्रोन कुठून आले? या बद्दल पाकिस्तानने अजून काहीही सांगितलेलं नाही. कोणीही अजून या ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या पाच शहरांशिवाय उमरकोटमध्ये सुद्धा ड्रोन ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. सर्वात जास्त 3 ड्रोन ब्लास्ट लाहोरमध्ये झाले आहे. पाकिस्तानी मीडियानुसार आतापर्यंत पाकिस्तानात एकूण 12 बॉम्बस्फोट झाले आहेत. लाहोरच्या सैन्य ठिकाणांजवळ हे ड्रोन बलास्ट झाले आहेत.
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम पूर्ण फेल
या ड्रोन स्फोटांवरुन पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम पूर्ण फेल ठरल्याच दिसत आहे. बुधवारी रात्री पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी एअर फोर्सच भरपूर कौतुक केलं होतं. पाकिस्तानी एअरफोर्स मजबूतीने मैदानात आहे असं ते म्हणालेसे. त्यानंतर पाकिस्तान एअर फोर्सच्या प्रमुखाने असीम मुनीर यांची भेट घेतली होती.