भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती खराब झाली आहे. दहशतवाद्यांना मदत करण्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहे. भारताची क्षेपणास्त्र बहावलपूर आणि मुरीदकेसारख्या ठिकाणी पोहचल्या. त्यामुळे पाकिस्तानकडे असलेली चीन हवाई संरक्षण प्रणाली (HQ-9 डिफेन्स सिस्टम) अयशस्वी ठरली आहे. पाकिस्तान चीनकडून मिळालेली ही प्रणाली भारतीय हवाईदलाविरोधात ढाल समजत होता. पाकिस्तान सकाळी ड्रोन हल्ल्याचे दावा करत राहिला. या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम नष्ट केली.
HQ-9 नष्ट होणे ही सामान्य सैनिक घटना नाही. ही पाकिस्तानविरोधात राजकीय, कुटनीती आणि मनोवैज्ञानिक झटका आहे. त्याचा आवाज बीजिंगपासून इस्लामाबादपर्यंत ऐकू येत आहे. HQ-9 चीनची सर्वात प्रमुख एअर डिफेन्स सिस्टीम आहे. ही प्रणाली अमेरिकेची Patriot आणि रशियाची S-300 ची कॉपी आहे.
HQ-9 एअर डिफेन्स सिस्टमची रेंज 120–250 किमी आहे. या प्रणालीबाबत चीनचा दावा आहे की, AESA रडार आणि मल्टी-टारगेट एंगेजमेंट करु शकतो. पाकिस्तान या प्रणालीला गेम चेंजर म्हणत होता. त्यासाठी कराची, ग्वादर आणि रावळपिंडीसारख्या ठिकाणी ही डिफेन्स सिस्टम बसवण्यात आली होती. परंतु भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअरस्ट्राइक केल्यावर चीनच्या HQ-9 प्रणालीची पोलखोल झाली.
पाकिस्तानने 2021 मध्ये चीनकडून HQ-9B प्रणाली घेतली होती. त्यामुळे पाकिस्तानी हवाई दलाची क्षमता वाढणार असल्याचा दावा केला जात होता. त्यावेळीही चीनची ही प्रणाली संशयाच्या भोवऱ्यात आली होती. अनेक रिपोर्टमधून चीन डिफेन्स सिस्टीमची क्षमता चांगली नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु चीनच्या दबावामुळे पाकिस्तानने ही प्रणाली विकत घेतली. त्यानंतर ही प्रणाली कराची, ग्वादर आणि इस्लामाबाद या ठिकाणी बसवली. पाकिस्तानने भारताच्या राफेल, ब्रह्मोस आणि Su-30MKI सारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही प्रणाली घेतली होती. केवळ ड्रोन हल्ल्यातच पाकिस्तानची चीनी डिफेन्स सिस्टीम नष्ट झाली आहे. भारताने गुरुवारी पाकिस्तानमधील १२ शहरांमध्ये ड्रोन हल्ले घडवून आणले.