OPERATION SINDOOR: दहशतवादाला थारा नाही! सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया; म्हणतो, भारताची ढाल...
esakal May 07, 2025 08:45 PM

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. भारताने या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' () असे नाव दिले आहे. या हल्ल्यात जैशच्या 3 कमांडरसह ९० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारतीय सैन्याच्या या पराक्रमाचा सर्व भारतीयांना अभिमान वाटतोय आणि सर्व सामान्यपासून सेलेब्रेटींपर्यंत सारेच त्यांचे कौतुक करत आहेत. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( ) यानेही भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम ठोकला आहे.

सचिन तेंडुलकरने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिलं की, “Fearless in unity. Boundless in strength. India's shield is her people. There's no room for terrorism in this world. We're ONE TEAM!” म्हणजेच, "एकता निर्भय आहे. त्याची शक्ती असीम आहे. भारताची खरी ढाल म्हणजे तिची जनता! दहशतवादाला जगात कुठेच थारा नाही. आम्ही सर्व एकाच टीममध्ये आहोत."

दहशतवादाला विरोध करत, भारताची अखंडता आणि सैन्याच्या शौर्याला सलाम करत सचिन तेंडुलकरने देशवासीयांचं मन जिंकलं आहे.सचिनसह वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सुरेश रैना, प्रग्यान ओझा, वेंकटेश अय्यर, आकाश चोप्रा यांनीही भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले आहे.

वीरूने आणखी एक ट्विट केलं की, जर तुमच्यावर कोणी दगड फेकत असेल तर त्याच्यावर फुलं फेका, परंतु कुंडीसकट... जय हिंद...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये २५ मिनिटांच्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांना ठार मारले. ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा होता. रौफ असगर गंभीर जखमी झाला होता. भारतीय सशस्त्र दलांनी बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचा तळ यासह दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.