Operation Sindoor : आम्ही अल्लाह…ऑपरेशन सिंदूर नंतर अल कायदा वळवळली, भारताला काय दिली धमकी
GH News May 08, 2025 01:07 PM

Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान बिथरला आहे. त्यांना एका झटक्यात त्यांचा अब्बाजान आठवला. तिकडे जीनाची कबर सुद्धा हादरली. इतकेच नाहीतर जगातील दहशतवादी संघटनांच्या पायखालची जमीन सरकली आहे. त्यातच भारताच्या या कारवाईने अल-कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे. अल-कायदाच्या (Al-Qaeda) भारतीय उपमहाद्वीप शाखेने (AQIS) ऑपरेशन सिंदूरवर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. अस-सहाब मीडिया (As-Sahab Media) या माध्यमातून त्यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे.

AQIS ने काय दिली धमकी

“6 मे 2025 ला रात्री भारतातील ‘भगवा सरकार’ ने पाकिस्तानमधील 6 जागांवर हल्ला करण्यात आला. खासकरून मशिदी आणि रहिवाशी भागांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये अनेक मुसलमान शहीद आणि जखमी झाले. आम्ही अल्लाहचे आहोत आणि त्याच्याकडेच परत जाणार आहोत. अल्लाह हा शहिदांना स्वर्गात जागा देवो. जखमींना लवकर बरं करो. हा हल्ला म्हणजे भगव्या सरकारच्या गुन्ह्यांच्या यादीतील आणखी एक काळा अध्याय आहे.”

अशी पल्लाळबाजी केल्यानंतर अल कायदाने भारताविरोधात खोटा प्रचाराचा अजेंडा वापरला. त्यानुसार, “भारतातील इस्लाम आणि मुसलमान यांच्याविरोधातील युद्ध नवीन नाही. हा वर्षानुवर्षे सुरू आहे. भारत आणि काश्मीरमधील मुसलमानांवर अन्याय होतो. मोदी सरकार सैन्य, राजकीय, सांस्कृतिक आणि मीडिया या माध्यमातून इस्लाम आणि मुसलमान यांना संपवण्याचा डाव आखण्यात आला आहे.”

जिहादची दिली धमकी

मुसलमानांनी आता भारताविरोधात जिहाद करावा. आपण अल्लाहचे नाव अजून मजबूत करण्याची वेळ आली आहे. अल्लाहच्या मदतीने आम्ही शेवटपर्यंत लढत राहू. आम्ही या हल्ल्याचा बदल घेऊ, अशी पोकळ धमकी अल कायदाने दिली आहे.

पाकिस्तानातील 9 ठिकाणं उद्धवस्त

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने लोईटरिंग म्युनिशन या ड्रोन्सला आत्मघाती अथवा कामीकेज ड्रोन्सचा वापर केला. हे LMS ड्रोन अनमॅन्ड एरिअल ड्रोन्स आहेत. त्यांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळांचा अचूक वेध घेतला. पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, मुरीदके येथील लष्कर-ए-तैयब्बाचे ठिकाण, चक अमरू, सियालकोट, भीमबेर, गुलपूर, कोटली, बाघ आणि मुझफ्फराबादचा परिसराचा समावेश आहे. या दरम्यान पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला करण्यात आला नाही. संरक्षण मंत्रालयाने बुधवारी मध्यारात्री 1.44 वाजता ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. बुधवारी भल्या पहाटे ही कारवाई झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.