दोन आठवड्यांपूर्वी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांना आपले प्राण गमवाले.
या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ७ मे २०२५ च्या मध्यरात्री भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केले.
या ऑपरेशन सिंदूर मोहिमेची माहिती, कर्नल सोफिया कुरेश आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे या दोन्ही अधिकारी भारतभरात चर्चेत राहिल्या.
ऑपरेशन सिंदूर मोहिमेबाबत भारतभरातून कौतुक झालं. त्याचसोबत दोन महिला अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्याने त्यातून धर्मनिरपेक्षता, स्त्रीशक्ती आणि एकतेचा संदेशही देण्यात आला.
यावर भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानेही प्रतिक्रिया दिली आहे.
सानियाने पत्रकार फाय डीसुझा यांची पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली, ज्यात कर्नल सोफिया कुरेश आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सानियाने लिहिले, 'हा अतिशय शक्तिशाली फोटो आहे, जो एक राष्ट्र म्हणून आपण कोण आहोत याचा उत्तम संदेश देतो.'